९९ अर्जांची विक्री
By Admin | Updated: September 20, 2014 23:39 IST2014-09-20T23:24:37+5:302014-09-20T23:39:02+5:30
हिंगोली : विधानसभा निवडणुकीची अधिसूचना २० सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झाली असून पहिल्याच दिवशी हिंगोली, कळमनुरी व वसमत मतदारसंघामध्ये एकूण ९९ नामनिर्देशनपत्रांची विक्री झाली आहे.

९९ अर्जांची विक्री
हिंगोली : विधानसभा निवडणुकीची अधिसूचना २० सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झाली असून पहिल्याच दिवशी हिंगोली, कळमनुरी व वसमत मतदारसंघामध्ये एकूण ९९ नामनिर्देशनपत्रांची विक्री झाली आहे.
हिंगोली मतदारसंघातील १५ व्यक्तींनी ३० नामनिर्देशनपत्रे नेली असून कळमनुरी मतदारसंघात ७ व्यक्तींनी १७ अर्ज तर वसमत मतदारसंघात १३ व्यक्तींनी ५२ अर्ज नेले आहेत. पहिल्या दिवशी एकूण ९९ नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली आहे. प्रशासकीय यंत्रणेकडून मतदान प्रक्रियेची संपूर्ण तयारी केली जात आहे. १५ आॅक्टोबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार असून ५ संवेदनशील केंद्रावर विशेष सुरक्षा तैनात राहणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी खुदाबक्ष तडवी यांनी पत्रपरिषदेत दिली आहे. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी राम गगरानी, तहसीलदार विद्याचरण कडवकर, तहसीलदार मेंडके यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
हिंगोली मतदारसंघात सेनगाव तालुक्यातील १३३ गावांसाठी १७२ मतदान केंद्र व हिंगोली तालुक्यातील ८३ गावांसाठी १५० केंद्र राहणार आहेत. एकूण २१६ गावांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात ३२२ मतदान केंद्र असून हिंगोलीतील ३ तर सेनगाव व गोरेगावचा समावेश संवेदनशील केंद्रांमध्ये होतो. १ लाख ४५ हजार ९२२ पुरूष व १ लाख २८ हजार ६४३ महिलांना एकूण २ लाख ७४ हजार ५६५ ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. ४० क्षेत्रीय अधिकारी नेमून वाढोणा, येलदरी व कनेरगाव नाका येथे चेकपोस्ट स्थापन केले आहेत. ३ भरारी पथके असून कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)