पालिका कर्मचार्‍यांचा पगार तीन महिन्यांपासून थकला

By Admin | Updated: May 25, 2014 01:09 IST2014-05-25T00:46:10+5:302014-05-25T01:09:40+5:30

पूर्णा : येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी राजीव बुबने यांची बदली झाल्यानंतर पालिकेंतर्गत येणारे सर्व कामकाज खोळंबले आहे़ पालिकेतील कर्मचार्‍यांचा पगारही तीन महिन्यांपासून थकला आहे़

The salary of municipal employees has been stagnant for three months | पालिका कर्मचार्‍यांचा पगार तीन महिन्यांपासून थकला

पालिका कर्मचार्‍यांचा पगार तीन महिन्यांपासून थकला

पूर्णा : येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी राजीव बुबने यांची बदली झाल्यानंतर पालिकेंतर्गत येणारे सर्व कामकाज खोळंबले आहे़ पालिकेतील कर्मचार्‍यांचा पगारही तीन महिन्यांपासून थकला आहे़ त्यामुळे या ठिकाणी कायम स्वरुपी मुख्याधिकारी नेमावा, अशी मागणी होत आहे़ पूर्णा पालिकेचे मुख्याधिकारी राजीव बुबने यांची लोकसभा निवडणुकीनंतर तुळजापूर येथे बदली झाली़ त्यांच्या बदलीनंतर पूर्णा पालिकेचे मुख्याधिकारी पद रिक्त आहे़ या पदावर नव्या अधिकार्‍याची नियुक्ती होईल, अशी नागरिकांना अपेक्षा होती़ परंतु, एक महिना उलटूनही हे पद रिक्तच आहे़ मुख्याधिकारी नसल्याने गावातील स्वच्छता, आरोग्य आदी बाबींसह कार्यालयीन कामकाज ठप्प झाले आहे़ तत्कालीन मुख्याधिकारी बुबने यांच्याकडे पूर्णा पालिकेच्या मुख्याधिकारी पदासह जिल्हा नियोजन विभागाचा अतिरिक्त कार्यभार होता़ आचारसंहिता लागल्यापासून पालिकेच्या कारभाराकडे दुर्लक्ष झाले़ या पालिकेत सुमारे २०० कर्मचारी आहेत़ त्यांचे वेतन तीन महिन्यांपासून थकले़ त्यामुळे कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे़ एखाद्या नगरपालिकेचे मुख्याधिकारी पद रिक्त असल्यास त्या शहराजवळील दुसर्‍या पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांकडे तात्पुरता कार्यभार दिला जातो़ पूर्णा पालिकेस गंगाखेड शहर जवळ असून, गंगाखेडच्या मुख्याधिकार्‍यांकडे तात्पुरत्या स्वरुपात कार्यभार दिल्यास सोयीचे ठरेल, अशी नागरिकांची अपेक्षा आहे़ (प्रतिनिधी)जिल्हाधिकार्‍यांनी पूर्णा पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांचा पदभार पूर्णेच्या तहसीलदार सुरेखा नांदे यांच्याकडे दिला आहे़ परंतु, पूर्णा पालिकेला कायमस्वरुपी मुख्याधिकारी द्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे़

Web Title: The salary of municipal employees has been stagnant for three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.