साक्षी, अंजली यांना सुवर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:20 IST2018-06-13T00:19:54+5:302018-06-13T00:20:19+5:30

ठाणे येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत टाक्सबॉक्सिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी प्रभावी कामगिरी करताना चार पदकांची लयलूट केली. त्यात अंजली रकटे हिने १२ वर्षांखालील आणि साक्षी वाघिरे हिने १४ वर्षांखालील मुलींच्या गटात सुवर्णपदकांची कमाई केली.

Sakshi, Anjali Gold | साक्षी, अंजली यांना सुवर्ण

साक्षी, अंजली यांना सुवर्ण

ठळक मुद्देराज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा : शुभांगीला रौप्य, माहीला कास्यपदक

औरंगाबाद : ठाणे येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत टाक्सबॉक्सिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी प्रभावी कामगिरी करताना चार पदकांची लयलूट केली. त्यात अंजली रकटे हिने १२ वर्षांखालील आणि साक्षी वाघिरे हिने १४ वर्षांखालील मुलींच्या गटात सुवर्णपदकांची कमाई केली. मुलींच्या १७ वर्षांखालील गटात शुभांगी तोमर हिने रौप्यपदक पटकावले. मुलींच्या १४ वर्षांखालील वयोगटात माही निकम हिने कास्यपदक मिळवले. पदकविजेत्या खेळाडूंना राहुल टाक यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल औरंगाबाद जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत जोशी, सचिव पंकज भारसाखळे, क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, टाक्स अकॅडमीचे अध्यक्ष संदीप टाक व राहुल टाक यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

 

Web Title: Sakshi, Anjali Gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.