सक्षणा सलगर यांच्यासह आठ जणांविरूध्द गुन्हा
By Admin | Updated: May 9, 2017 23:47 IST2017-05-09T23:44:06+5:302017-05-09T23:47:30+5:30
ढोकी : भावजईचा शारीरिक, मानसिक जाच केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सक्षणा सलगर यांच्यासह आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला

सक्षणा सलगर यांच्यासह आठ जणांविरूध्द गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
ढोकी : भावजईचा शारीरिक, मानसिक जाच केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या तथा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मराठवाडा संघटक सक्षणा सलगर यांच्यासह आठ जणांविरूध्द ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
याबाबत अधिक माहिती अशी की, तेर येथील मनिषा सचिन सलगर यांना पतीच्या निधनानंतर सासू-सासऱ्यांसह सासरच्या मंडळींकडून १८ मार्च ते ९ मे या कालावधीत दोन मुलींपैकी एक मुलगी राखी विठ्ठल गडदे यांना दत्तक द्यावी, विवाहितेने माहेरी जाऊन रहावे या कारणासाठी शिवीगाळ करीत धमकी दिली़ तसेच मारहाण करून दोन्ही मुली राखी गडदे यांना दत्तक देऊन शारीरिक मेहनतीचे काम लावून शारीरिक, मानसिक जाच केल्याची फिर्याद मनिषा सलगर यांनी मंगळवारी ढोकी पोलीस ठाण्यात दिली़ मनिषा सचिन सलगर यांच्या फिर्यादीवरून सासू केसरबाई सिद्राम सलगर, सासरे सिद्राम लिंबाजी सलगर, नणंद सक्षणा सिद्राम सलगर, नणंद सरस्वती सिद्राम सलगर, नणंद राखी विठ्ठल गडदे, नंदवा विठ्ठल गडदे, दीर रणधीर सिद्राम सलगर, जाऊ रूपाली रणधीर सलगर (सर्व रा़ तेर ता़ उस्मानाबाद) यांच्याविरूध्द ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अधिक तपास पोउपनि वाघ हे करीत आहेत़