दांडियामध्ये झाल्या ‘सखी’ तरबेज
By Admin | Updated: September 28, 2016 00:39 IST2016-09-28T00:12:37+5:302016-09-28T00:39:22+5:30
औरंगाबाद : येत्या शनिवारपासून सुरुवात होत आहे ती धमाल दांडियाने सजलेल्या नवरात्रोत्सवाला आणि या नवरात्रोत्सवात दांडियाचा मनापासून आनंद लुटणार आहेत

दांडियामध्ये झाल्या ‘सखी’ तरबेज
औरंगाबाद : येत्या शनिवारपासून सुरुवात होत आहे ती धमाल दांडियाने सजलेल्या नवरात्रोत्सवाला आणि या नवरात्रोत्सवात दांडियाचा मनापासून आनंद लुटणार आहेत आपल्या सखी मंचच्या तमाम सखी. कारण दांडियाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण पूर्ण करून आता या सखी दांडियाच्या मंडपात उतरणार आहेत. सखी मंचच्या वतीने आयोजित दांडिया शिबिराचा सखींनी पुरेपूर फायदा उचलला आणि आकर्षक दांडिया खेळण्याचा मूलमंत्र जाणून घेतला.
लोकमत लॉन येथे मागील पाच दिवसांपासून रंगत असलेल्या दांडिया प्रशिक्षण शिबिराचा मंगळवारी समारोप झाला. गुंजन मुंदडा यांनी सखींना दांडिया शिकवून त्यांच्यात नवीन आत्मविश्वास जागृत केला. छकडी, डबल छकडी, पाचिया या पारंपरिक प्रकारांपासून ते बॉम्बे स्टाईल, वेस्टर्न अशा आधुनिक प्रकारांपर्यंत त्यांनी अनेक प्रकार शिकवले. घरगुती कामांमधून वेळ काढत सखींनी या शिबिराला भरभरून प्रतिसाद दिला. आता या तमाम सखींना प्रतीक्षा आहे ती लवकरच सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवाची.