शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

‘सखा’चा मारेकरी ‘सुखदेव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:50 IST

सख्ख्या भावाचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह पटरीजवळ फेकून दिल्याची घटना रविवारी रात्री घडली; परंतु मृताच्या खिशातील आधार कार्डावरून माग काढत आरोपीच्या मुसक्या मुकुंदवाडी पोलिसांनी आवळल्या

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सख्ख्या भावाचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह पटरीजवळ फेकून दिल्याची घटना रविवारी रात्री घडली; परंतु मृताच्या खिशातील आधार कार्डावरून माग काढत आरोपीच्या मुसक्या मुकुंदवाडी पोलिसांनी आवळल्या. संपत्तीच्या वादातून सुखदेवने त्याचा लहान भाऊ सखारामचा काटा काढल्याची खळबळजनक घटना पोलीस तपासातून समोर आली.सखाराम उत्तम सतुके (३२, रा. राधास्वामी कॉलनी, जटवाडा), असे मृताचे नाव असून, मारेकरी सुखदेव उत्तम सतुके (४०, रा. जयभवानीनगर) आहे. सखाराम दारूचा व्यसनी होता. त्याने गावाकडील एक एकर जमिनीतील एक तुकडा विकून पैसे दारूमध्ये उडविले होते. सुखदेव त्यास सतत पैशाची मागणी करीत होता. सखाराम सतुकेचे पत्नीसोबत पटत नसल्याने तो तिच्यापासून वेगळा राहत होता. दारू पिऊन तो भावाशी भांडत होता. रविवारी रात्री तो दारू पिऊन घरी आला आणि त्याने सुखदेवला मारहाण करीत त्याचा गळा पकडला. दोघांत हाणामारी सुरू झाली. सुखदेवने जोराचा धक्का दिल्याने सखाराम खाली पडला. तेवढ्यात सुखदेवने दगड उचलून त्याच्या डोक्यात घातला व सखाराम गप्पगार झाला. काही वेळाने त्याने मृतदेह ओढत नेऊन पटरीजवळ टाकला. तो मृतदेह त्याला पटरीवरच टाकायचा होता; परंतु पटरी जमिनीपासून उंच असल्याने त्याला ते शक्य झाले नाही.जयभवानीनगर येथे संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नाथा जाधव व पथकाला संशय आला. तो रेल्वे अपघातात नसून, काही तरी घातपात असल्याचे निदर्शनास आल्याने सहायक पोलीस आयुक्त गायकवाड यांनीदेखील घटनास्थळी भेट देऊन फौजदार बनसोड, सहायक फौजदार शेख हारुण, कौतिक गोरे, पोकॉ. प्रकाश सोनवणे, विजय चौधरी, कैलास काकड, शेख असलम, सोमकांत, भालेराव, सुनील पवार, लक्ष्मण राठोड यांना कामाला लावले.मृताच्या खिशात आढळलेल्या कागदपत्रांवरून पोलिसांनी नातेवाईकांशी संपर्क साधला. मृताची पत्नी शकुंतलाबाईने घाटीत मृतदेह पाहून तो पतीचा असल्याचे सांगितले. तसेच तीन-चार दिवसांपासून ते भावाकडे जयभवानीनगर येथे गेले होते, अशी माहिती दिली. पोलिसांनी सुखदेवला फोन लावला असता फोन बंद असल्याचे समजले. त्यानंतर जयभवानीनगरात पोलीस पथकाने सुखदेवला ताब्यात घेतले. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरी पाहणी केली.घरासमोरील रक्ताचे डाग आणि रक्ताने माखलेले दगड पाहून त्याने स्वत:हूनच खुनाची कहाणी सांगून, ‘साहेब, मला माफ करा, तो दारूच्या नशेत मारहाण करून गळा दाबून मला मारण्याच्या तयारीत होता. हाणामारीत त्याला दगडाने मारले अन् त्याचा मृत्यू झाला,’ अशी कबुली त्याने दिली.मृत सखारामला दोन बायका आहेत. एका बायकोचे प्रकरण न्यायालयातअसल्याचे सांगण्यात आले, तर दुसऱ्या बायकोसोबतही त्याचे पटत नसल्याने तो असाच पाहुण्यांकडे एक-दोन दिवस राहत होता. सुखदेवचा जयभवानीनगरात छोटासा भूखंड असून, त्यावर पत्र्याचे घर करून तो राहतो. बायको, मुले कन्नड तालुक्यातील तांबी दहेगाव येथे राहतात. आठवडाभर मिळालेल्या मजुरीतून तो गावाकडे जाऊन राहत होता, पुन्हा शहरात येऊन मजुरी करीत होता.