‘भगव्या ध्वजांनी सजली लातूर नगरी...
By Admin | Updated: February 19, 2016 00:37 IST2016-02-19T00:27:17+5:302016-02-19T00:37:17+5:30
लातूर : छत्रपती शिवाजी महाराज यांची ३८६ वी जयंती शुक्रवारी उत्साहात साजरी होत असून, लातूर नगरी भगव्या ध्वजांनी सजली आहे.

‘भगव्या ध्वजांनी सजली लातूर नगरी...
लातूर : छत्रपती शिवाजी महाराज यांची ३८६ वी जयंती शुक्रवारी उत्साहात साजरी होत असून, लातूर नगरी भगव्या ध्वजांनी सजली आहे. विविध संस्था, संघटनांनी जयंती उत्सवाची जय्यत तयारी केली असून, भव्य मोटारसायकल रॅलीसह विविध उपक्रमांचे नियोजन शहर व जिल्हाभरात करण्यात आले आहे.
लातूर शहरातील मुख्य रस्त्यांवरील दुभाजकांत दुतर्फा ध्वज लावले आहेत. या ध्वजांमुळे शहर भगवेमय झाले आहे. छत्रपती शिवरायांचे मोठ मोठे बॅनर्स आणि ध्वज लावल्याने शहराचे सौंदर्य वाढले आहे. श्री सिद्धेश्वर मंदिरापासून शिवजयंतीनिमित्त भव्य मोटारसायकल रॅली निघणार असल्याने शहरातील अनेक दुचाकींवर गुरुवारी रॅलीचे स्टीकर्स व ध्वज दिसून आले. रॅलीबरोबर रक्तदान शिबीर, टंचाईमुळे मोफत पाणी वाटप तसेच व्याख्याने अशा विविध कार्यक्रमांचे आयोजनही विविध संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून जयंतीचा माहोल आहे.