सैराट जोडप्याला कळमनुरीत पकडले

By Admin | Updated: October 17, 2016 23:58 IST2016-10-17T23:56:55+5:302016-10-17T23:58:45+5:30

माजलगाव : तालुक्यातील मालीपारगाव येथून रविवारी अल्पवयीन मुलीचे लग्नाच्या अमिषाने अपहरण झाले होते.

Sairat caught the couple at a cross | सैराट जोडप्याला कळमनुरीत पकडले

सैराट जोडप्याला कळमनुरीत पकडले

माजलगाव : तालुक्यातील मालीपारगाव येथून रविवारी अल्पवयीन मुलीचे लग्नाच्या अमिषाने अपहरण झाले होते. या जोडप्यास ग्रामीण पोलिसांनी अवघ्या १२ तासात कळमनुरी (जि. हिंगोली) येथून ताब्यात घेतले. मुलीला नातेवाईकांच्या स्वाधीन केले असून मुलाची रवानगी पोलीस कोठडीत झाली.
विजय आसाराम राठोड (रा. बाराभाई तांडा, ता. माजलगाव) असे आरोपीचे नाव आहे. त्याने सायंकाळी सहा वाजता अल्पवयीन मुलीला दुचाकीवरुन पळवले होते. मुलीच्या नातेवाईकांनी ग्रामीण ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन गुन्हा नोंद झाला होता. दरम्यान, सोमवारी सकाळी या जोडप्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना माजलगावला आणले. न्यायालयाने विजय राठोडला १९ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. (वार्ताहर)

Web Title: Sairat caught the couple at a cross

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.