संत गोरोबा काकांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे रवाना
By Admin | Updated: November 14, 2015 00:50 IST2015-11-14T00:13:34+5:302015-11-14T00:50:48+5:30
तेर : उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काकांची पालखी प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी कार्तिकीवारीसाठी पंढरपूरकडे रवाना झाली.

संत गोरोबा काकांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे रवाना
तेर : उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काकांची पालखी प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी कार्तिकीवारीसाठी पंढरपूरकडे रवाना झाली.
शुक्रवारी दुपारी ४ वाजता विधीवत पूजा करुन तेरचे माजी सरपंच अमरसिंह पाटील यांनी खांदा देवून पालखी मार्गस्थ केली. यावेळी दत्तात्रय मुळे, बाळासाहेब वाघ, महादेव खटावकर, श्रीमंत फंड, रणदीर सलगर, विजयसिंह फंड, कुंभार महासंघाचे जिल्हाध्यक्ष नागनाथ कुंभार, विठ्ठल राऊत आदींची उपस्थिती होती. प्रथमत: संत गोरोबा काका मंदिरात आरती होवून पालखीमध्ये श्री संत गोरोबा काकांचा मुखवटा (मुर्ती) ठेवण्यात आली. मंदिरापासून पालखी मिरवणूक पेठ, राममंदिर, ग्रामपंचायत, नृसिंहवेस, सुलतान चौक, मातंगवस्ती, बौद्धनगर, सत्यपुरीनगर या प्रमुख रस्त्यांनी काढण्यात आली.
हा पालखी सोहळा हिंगळजवाडी, उस्मानाबाद, भातंबरे, वैराग, यावली, खैराव, अनगर, रोपळे आदी ठिकाणी पालखीचा मुक्काम होणार असून, २१ नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथे पालखी पोहचणार आहे. तर काल्याचे कीर्तन करुन २५ नोव्हेंबर रोजी पालखीचा परतीचा प्रवास सुरु होणार आहे. ५ डिसेंबरला पालखी परत तेरमध्ये येणार आहे. गोरोबा काका शिवमंदिर ट्रस्टच्या वतीने पाण्याचे टँकर, आरोग्य सुविधा आदींची व्यवस्था करण्यात आली आहे.