सेलूत राष्ट्रीय बालविज्ञान विकास परिषद
By Admin | Updated: June 26, 2017 23:49 IST2017-06-26T23:43:33+5:302017-06-26T23:49:27+5:30
सेलू : येथील प्रिन्स अकॅडमीमध्ये जिज्ञासा ट्रस्ट ठाणे, राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद घेण्यात आली.

सेलूत राष्ट्रीय बालविज्ञान विकास परिषद
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित प्रिन्स अकॅडमीमध्ये जिज्ञासा ट्रस्ट ठाणे, भारत सरकार व राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद घेण्यात आली.
संस्थाध्यक्ष डॉ संजय रोडगे, सचिव डॉ.सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, प्राचार्या प्रीती सँम्युअल, एनसीसीचे जिल्हा समन्वयक भरतकुमार लाड आदींची उपस्थिती होती़
डॉ. रोडगे म्हणाले, पेंटा पावर शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती, कल्पकता, कृतिशील पद्धत वाढते़ त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी पेंटा शिक्षण पद्धत महत्वाची आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच एनसीएससी राज्य सरचिटणीस विश्वाश कोरडे, एनसीसीच्या कार्यकारी अधिकारी संध्या धरडे यांनीही मार्गदर्शन केले. तसेच राज्य संचालक मुबद्रीकर यांनीही विविध प्रकल्पाचे सादरीकरण केले़ डॉ संजय रोडगे यांच्या हस्ते गणित व विज्ञान विषयामध्ये उत्कृष्ट योगदान दिलेल्या एन बी चौरे, भगवान क्षीरसागर, रविशंकर पी. पानपट, बी. मोगल, एऩ रोडगे या ६ शिक्षकांचा प्रत्येकी ५००० रूपयांचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला़
सूत्रसंचालन पामे यांनी केले. रवी यांनी आभार मानले.