सेलूचा वीजपुरवठा १० तास खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2017 23:50 IST2017-07-08T23:49:01+5:302017-07-08T23:50:00+5:30
सेलू : शहरातील एमआयडीसी परिसरातील ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने शुक्रवारी रात्री वीजपुरवठा खंडित झाला होता. शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम सुरु होते.

सेलूचा वीजपुरवठा १० तास खंडित
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : शहरातील एमआयडीसी परिसरातील ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने शुक्रवारी रात्री वीजपुरवठा खंडित झाला होता. शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम सुरु होते. त्यामुळे दहा तास वीजपुरवठा खंडित राहिला.
शुक्रवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास महावितरणच्या मुख्य ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला. त्यामुळे रात्रभर वीजपुरवठा खंडित झाला होता. रेल्वेस्थानक, मारवाडी गल्ली आणि एक्स्प्रेस फिडरला या ट्रान्सफॉर्मरवरुन वीजपुरवठा केला जातो. बिघाड झाल्याने निम्म्या शहरामध्ये अंधार पसरला होता. महावितरणने शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. सकाळी ११ वाजेपर्यंत युद्धपातळीवर काम पूर्ण झाल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे मात्र चांगलेच हाल झाले.