शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

उदगीरच्या प्रवाशांची ससेहोलपट

By admin | Updated: September 17, 2014 01:13 IST

चेतन धनुरे / व्ही़एस़ कुलकर्णी , उदगीर निवडणुकीच्या तोंडावरच ‘उकरुन’ काढलेल्या नांदेड-बीदर राज्यमार्गावरील उड्डणापुलाने भविष्यात वाहतुकीची चांगली सोय होणार आहे़ परंतु, हे काम सुरु

चेतन धनुरे / व्ही़एस़ कुलकर्णी , उदगीरनिवडणुकीच्या तोंडावरच ‘उकरुन’ काढलेल्या नांदेड-बीदर राज्यमार्गावरील उड्डणापुलाने भविष्यात वाहतुकीची चांगली सोय होणार आहे़ परंतु, हे काम सुरु करताना सार्वजनिक बांधकाम विभागाने पर्यायी मार्गाचे कोणतेही नियोजन न करता वाहत्या वाहतुकीला ‘वळण’ दाखवून देत आपली जबाबदारी मात्र सोयिस्करपणे झटकली आहे़ या बेजबाबदार कृतीने दररोज या मार्गावरुन धावणाऱ्या ७ ते ८ हजार वाहनांसह जवळपास ४० हजार प्रवाश्यांची ससेहोलपट चालविली आहे़ इतक्यावरच हा कहर थांबत नाही तर शेजारच्याच नगरा राहणाऱ्या तब्बल ३२ हजार उदगीरकरांचे वाट अडविली गेली आहे़नांदेड-बीदर रोडवरील रेल्वे गेटवर १५ सप्टेंबरपासून उड्डाणपुलाचे काम सुरु करण्यात आले आहे़ त्यामुळे या मार्गावरील वाहनांची वर्दळ पर्यायी शेल्हाळ रोड व रिंग रोडमार्गे वळविण्यात आली आहे़ बीदर रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी शेल्हाळ रस्ता तर बीदर मार्गावरुन नांदेडकडे जाणाऱ्या अथवा उदगीर शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांसाठी रिंग रोडचा ‘रस्ता’ दाखविण्यात आला आहे़ या रस्त्यावरुन दररोज जवळपास ७ ते ८ हजार वाहने येजा करतात़ त्याद्वारे किमान ४० हजार प्रवाश्यांची वाहतूक होत असते़ शेल्हाळमार्गे बीदर रोडकडे जाणाऱ्या रस्ता नियमित मार्गापेक्षा ३़२ किमी अधिक अंतराचा आहे़ तर वळण रस्त्यावरुन उदगीरात येण्यासाठी वाहनांना ६़१ किमी अधिक अंतर मोजावे लागत आहे़ त्यामुळे वाहनधारकांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे़ भरीस भर म्हणून काहीसा जवळचा ठरणारा येणकी-माणकी रस्ताही कामामुळे बंद ठेवण्यात आल्याने वाहनधारकांची खड्डेमय रस्त्यानेच आदळआपट सुरु आहे़