उदगीरच्या प्रवाशांची ससेहोलपट
By Admin | Updated: September 17, 2014 01:13 IST2014-09-17T00:52:15+5:302014-09-17T01:13:39+5:30
चेतन धनुरे / व्ही़एस़ कुलकर्णी , उदगीर निवडणुकीच्या तोंडावरच ‘उकरुन’ काढलेल्या नांदेड-बीदर राज्यमार्गावरील उड्डणापुलाने भविष्यात वाहतुकीची चांगली सोय होणार आहे़ परंतु, हे काम सुरु

उदगीरच्या प्रवाशांची ससेहोलपट
चेतन धनुरे / व्ही़एस़ कुलकर्णी , उदगीर
निवडणुकीच्या तोंडावरच ‘उकरुन’ काढलेल्या नांदेड-बीदर राज्यमार्गावरील उड्डणापुलाने भविष्यात वाहतुकीची चांगली सोय होणार आहे़ परंतु, हे काम सुरु करताना सार्वजनिक बांधकाम विभागाने पर्यायी मार्गाचे कोणतेही नियोजन न करता वाहत्या वाहतुकीला ‘वळण’ दाखवून देत आपली जबाबदारी मात्र सोयिस्करपणे झटकली आहे़ या बेजबाबदार कृतीने दररोज या मार्गावरुन धावणाऱ्या ७ ते ८ हजार वाहनांसह जवळपास ४० हजार प्रवाश्यांची ससेहोलपट चालविली आहे़ इतक्यावरच हा कहर थांबत नाही तर शेजारच्याच नगरा राहणाऱ्या तब्बल ३२ हजार उदगीरकरांचे वाट अडविली गेली आहे़
नांदेड-बीदर रोडवरील रेल्वे गेटवर १५ सप्टेंबरपासून उड्डाणपुलाचे काम सुरु करण्यात आले आहे़ त्यामुळे या मार्गावरील वाहनांची वर्दळ पर्यायी शेल्हाळ रोड व रिंग रोडमार्गे वळविण्यात आली आहे़ बीदर रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी शेल्हाळ रस्ता तर बीदर मार्गावरुन नांदेडकडे जाणाऱ्या अथवा उदगीर शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांसाठी रिंग रोडचा ‘रस्ता’ दाखविण्यात आला आहे़ या रस्त्यावरुन दररोज जवळपास ७ ते ८ हजार वाहने येजा करतात़ त्याद्वारे किमान ४० हजार प्रवाश्यांची वाहतूक होत असते़ शेल्हाळमार्गे बीदर रोडकडे जाणाऱ्या रस्ता नियमित मार्गापेक्षा ३़२ किमी अधिक अंतराचा आहे़ तर वळण रस्त्यावरुन उदगीरात येण्यासाठी वाहनांना ६़१ किमी अधिक अंतर मोजावे लागत आहे़ त्यामुळे वाहनधारकांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे़ भरीस भर म्हणून काहीसा जवळचा ठरणारा येणकी-माणकी रस्ताही कामामुळे बंद ठेवण्यात आल्याने वाहनधारकांची खड्डेमय रस्त्यानेच आदळआपट सुरु आहे़