राज्य जिम्नॅस्टिक स्पर्धेत ‘साई’ला विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 00:57 IST2019-02-01T00:57:15+5:302019-02-01T00:57:43+5:30
पुणे येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत औरंगाबाद येथील ‘साई’च्या पश्चिम विभागीय केंद्राच्या संघाने मुलांच्या वरिष्ठ गटात विजेतेपद व कनिष्ठ गटात उपविजेतेपद पटकावले. मुलींच्या कनिष्ठ प्रकारात नुकत्याच झालेल्या खेलो इंडियात पदकांची उधळण करणाऱ्या रिद्धी व सिद्धी हत्तेकर या जुळ्या बहिणींनी याही स्पर्धेत आपला विशेष ठसा उमटवताना एकूण ४ पदकांची कमाई केली.

राज्य जिम्नॅस्टिक स्पर्धेत ‘साई’ला विजेतेपद
औरंगाबाद : पुणे येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत औरंगाबाद येथील ‘साई’च्या पश्चिम विभागीय केंद्राच्या संघाने मुलांच्या वरिष्ठ गटात विजेतेपद व कनिष्ठ गटात उपविजेतेपद पटकावले. मुलींच्या कनिष्ठ प्रकारात नुकत्याच झालेल्या खेलो इंडियात पदकांची उधळण करणाऱ्या रिद्धी व सिद्धी हत्तेकर या जुळ्या बहिणींनी याही स्पर्धेत आपला विशेष ठसा उमटवताना एकूण ४ पदकांची कमाई केली.
मुलांच्या वरिष्ठ गटात अजय पगारे, शुभम तांबे, करण खरातमोळ, तर कनिष्ठ गटात व्यंकटेश ए., तसेच मुलींच्या कनिष्ठ गटात रिद्धी हत्तेकर व सिद्धी हत्तेकर या खेळाडूंचा समावेश होता. मुलींच्या कनिष्ठ गटात वैयक्तिक अजिंक्यद स्पर्धेत रिद्धी हत्तेकरने कास्यपदक जिंकले, तर सिद्धी हत्तेकर हिने चौथे स्थान प्राप्त केले, तसेच रिद्धीने बॅलेन्सिंग बीम या साधन प्रकारात रौप्यपदक पटकावले. सिद्धी हत्तेकर हिने आपल्या कामगिरीत सातत्य राखीत टेबलवॉल्ट या साधन प्रकारात रौप्यपदक, तर अन इव्हन बार या साधन प्रकारात कास्यपदक जिंकले. रिद्धी व सिद्धी हत्तेकर या शारदा मंदिर शाळेच्या विद्यार्थिनी आहेत. पदकविजेत्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रामकृष्ण लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.