‘साई’चे अस्तित्व एम.सी. ठरविणार
By Admin | Updated: June 27, 2017 01:04 IST2017-06-27T00:58:01+5:302017-06-27T01:04:27+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे परीक्षा मंडळ, विद्या परिषदेने चौका येथील वादग्रस्त साई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रथम वर्षाचे संलग्नीकरण रद्द करण्याचा निर्णय घेतला

‘साई’चे अस्तित्व एम.सी. ठरविणार
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे परीक्षा मंडळ, विद्या परिषदेने चौका येथील वादग्रस्त साई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रथम वर्षाचे संलग्नीकरण रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर मंगळवारी (दि.२७) व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. यानंतर राज्यपालांच्या मान्यतेसाठी हा निर्णय पाठविण्यात येणार असल्याचे समजते.
अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या परीक्षेत साई अभियांत्रिकी महाविद्यालयाने झालेल्या पेपरच्या उत्तरपत्रिका शिवसेना नगरसेवकाच्या घरी नेऊन विद्यार्थ्यांना लिहिण्यास देण्याचा प्रताप केला होता.
या महाविद्यालयाच्या कृत्यामुळे विद्यापीठाची मोठी बदनामी झाली. त्यावर कडक कारवाई करण्यासाठी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी चौकशी समिती नेमून सत्य शोधन करत महाविद्यालयाचे संलग्नीकरण रद्द करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांनी मंजूर केल्यानंतर सर्वाधिकार असलेल्या व्यवस्थापन परिषदेतही उद्या, यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यापीठाचे कुलपती आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल. साई अभियांत्रिकीचे प्रथम वर्षाचे संलग्नीकरण रद्द केल्यामुळे तंत्रशिक्षण संचलनालयानेही साईला प्रवेशाच्या यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.