सहारा सिटीचा प्रकल्प डिव्हाईन व्हेंचर्सकडे
By Admin | Updated: July 14, 2017 00:43 IST2017-07-14T00:41:31+5:302017-07-14T00:43:53+5:30
औरंगाबाद : गांधेली परिसरातील बीड बायपास रोडवरील १२ वर्षांपासून ‘बे’सहारा असलेल्या सहारा समूहाचा सिटी होम्स हा ९३ एकर जागेतील प्रकल्प आहे त्या स्थितीत डिव्हाईन व्हेंचर्स या गु्रपने टेकओव्हर केला आहे.

सहारा सिटीचा प्रकल्प डिव्हाईन व्हेंचर्सकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : गांधेली परिसरातील बीड बायपास रोडवरील १२ वर्षांपासून ‘बे’सहारा असलेल्या सहारा समूहाचा सिटी होम्स हा ९३ एकर जागेतील प्रकल्प आहे त्या स्थितीत डिव्हाईन व्हेंचर्स या गु्रपने टेकओव्हर केला आहे. सहाराच्या देशभरातील व्यवहाराला घरघर लागल्यानंतर ४३५ गुंतवणूकदारांचे तोंडचे पाणी पळाले होते. त्यांच्या आशा आता पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. सर्व कायदेशीर व्यवहार सिडबीसोबत पूर्ण केल्यानंतर हा प्रकल्प ताब्यात घेतल्याचे व्हेंचर्सचे भागीदार रवींद्र जैन, सीए देवेंद्र जैन, मनीष पारेख, पंकज पांडे यांनी सांगितले. राजेश भारुका, सदानंद शब्दे, गुरूविंदरसिंग मखीजा हेदेखील या प्रकल्पात भागीदार आहेत. या प्रकल्पाचे आगामी दोन-तीन महिन्यांत भूमिपूजन व उद्घाटन होणार आहे.
या प्रकल्पाचा व्यवहार किती रुपयांत झाला, याबाबत आताच सांगता येणार नाही. असे सांगून जैन यांनी सांगितले, जुन्या गुंतवणूकदारांची गुंतवणूक वाया गेल्यात जमा होती.
परंतु आम्ही हा प्रकल्प ताब्यात घेतल्यामुळे त्यांची गुंतवणूक सुरक्षित झाली आहे. त्यांनी ज्या उद्देशासाठी बुकिंग केली होती तो उद्देश आता पूर्ण होईल. चार टप्प्यांत हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असून, सुरुवातीच्या पहिल्या टप्प्याला ३ वषर््े लागतील. भविष्यात डीएमआयसी, आॅरिक, शेंद्रा- बिडकीन इंडस्ट्रीयल बेल्ट वाढणार आहे. त्या अनुषंगाने घरकुलांची गरज असणार आहे.
सहारा सिटीमध्ये ज्या सुविधा देण्याचा वायदा करण्यात आला होता, त्यापलीकडे जाऊन सुविधा देण्याचा प्रयत्न या प्रकल्पात राहणार आहे. मुंबई, पुणे आणि ठाण्यानंतर मराठवाड्यातील पहिली टाऊनशिप म्हणून हा परिसर असेल, असा दावा त्यांनी केला.