सॅफ्रॉन लॅण्डस्केप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:03 IST2021-06-16T04:03:26+5:302021-06-16T04:03:26+5:30

चौकट सॅफ्रॉन लॅण्डस्केप्स हा अत्याधुनिक सुविधा आणि आधुनिक व आकर्षक डिझाईन केलेला व्हिला आणि अपार्टमेंट्स असलेला गृहप्रकल्प आहे. औरंगाबादच्या ...

Saffron landscapes | सॅफ्रॉन लॅण्डस्केप्स

सॅफ्रॉन लॅण्डस्केप्स

चौकट

सॅफ्रॉन लॅण्डस्केप्स हा अत्याधुनिक सुविधा आणि आधुनिक व आकर्षक डिझाईन केलेला व्हिला आणि अपार्टमेंट्स असलेला गृहप्रकल्प आहे. औरंगाबादच्या क्षितिजावर असलेला हा एकमेव असा प्रकल्प आहे. अत्याधुनिक उच्च प्रतीच्या सुविधांमुळे उच्च राहणीमान आणि आधुनिक जीवनशैलीचा समावेश आहे. गोंगाटापासून दूर आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा अद्वितीय अनुभव या टाऊनशिपमध्ये अनुभवता येणार आहे. हा गृहप्रकल्प भविष्यातील औरंगाबाद स्मार्ट शहराचे नंदनवन होईल, असा विश्वास संचालकांनी व्यक्त केला.

सॅफ्रॉन गृहप्रकल्पाबरोबरच येथील व्यावसायिक स्वरूपाचा प्रकल्पही औरंगाबादच्या उद्योगविश्वात आपले स्थान निर्माण करेल. परिसरात मोठी दुकाने, कार्यालये, शोरूम्स आदींमुळे नवीन उद्योग केंद्र परिसरात उदयास येईल. रेल्वेस्थानक, विमानतळ, मध्यवर्ती बसस्थानक, रुग्णालये, शाळा, शॉपिंग मॉल, महाविद्यालये हे ३ ते ४ कि.मी. अंतरावर असल्याने परिसराला लाभलेली कनेक्टिव्हिटी ही प्रकल्पाची जमेची बाजू आहे. खऱ्या अर्थाने औरंगाबाद स्मार्ट शहर बनविण्याच्या दिशेने या प्रकल्पाची निर्मिती केली जात आहे.

Web Title: Saffron landscapes