औंढा नगरपंचायतीवर भगवा फडकणार
By Admin | Updated: January 15, 2016 23:33 IST2016-01-15T23:31:26+5:302016-01-15T23:33:35+5:30
हिंगोली : औंढा नगरपंचायतीत भाजपा कोणासोबत जाणार यावरून सुरू असलेल्या तर्कवितर्कांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

औंढा नगरपंचायतीवर भगवा फडकणार
हिंगोली : औंढा नगरपंचायतीत भाजपा कोणासोबत जाणार यावरून सुरू असलेल्या तर्कवितर्कांना आता पूर्णविराम मिळाला आहे. आ. तान्हाजी मुटकुळे व माजी आ.गजानन घुगे यांनी संयुक्तरित्या युतीची घोषणा करीत औंढा नगरपंचायतीवर भगवा फडकणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
घुगे म्हणाले, औंढ्यात शिवसेना व भाजपा पक्षीय धोरणाप्रमाणे एकत्र आली आहे. पहिल्या सव्वा वर्षासाठी शिवसेनेचा नगराध्यक्ष तर उपनगराध्यक्षपद भाजपाकडे राहील. दुसऱ्या सव्वा वर्षात भाजपचा नगराध्यक्ष व शिवसेनेचा उपनगराध्यक्ष राहील. तर स्वीकृत सदस्यपदी प्रथम शिवसेना व नंतर भाजपाला संधी दिली जाईल. तीर्थक्षेत्र असलेल्या औंढ्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे विकासाचा प्रस्ताव पाठविला असून आ. तान्हाजी मुटकुळे त्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. तो मंजूर करण्याचे आश्वासनही मिळाले आहे.
माजी जिल्हाध्यक्ष बाबाराव बांगर, पांडुरंग पाटील, तेजकुमार झांजरी, मिलिंद यंबल, सुरजितसिंह ठाकूर, सुभाष लदनिया, प्रशांत सोनी, जी.डी.मुळे आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)