शेतकºयांची नागपंचमी बँकेसमोरच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 00:03 IST2017-07-28T00:03:27+5:302017-07-28T00:03:27+5:30
मुखेड/लोहा : नागपंचमीनिमित्त घरोघरी गोडधोड केले जाते़ झोके बांधून खेळणे, हातावर मेहंदी काढणे, महिला व पुरुष एकत्र भुलई खेळणे, वारूळाला गाणे म्हणणे असा सण एकीकडे उत्साहात साजरा होत असताना दुसरीकडे या सणावर पाणी सोडत शेतकºयांनी पीकविमा भरण्यासाठी रात्री मुक्कामी राहून बँकेसमोर उभे राहून हा सण साजरा करण्याचे विदारक चित्र मुखेड, लोहा आदी तालुक्यात पहावयास मिळाले़

शेतकºयांची नागपंचमी बँकेसमोरच!
लोकमत न्यूज नेटवर्क
मुखेड/लोहा : नागपंचमीनिमित्त घरोघरी गोडधोड केले जाते़ झोके बांधून खेळणे, हातावर मेहंदी काढणे, महिला व पुरुष एकत्र भुलई खेळणे, वारूळाला गाणे म्हणणे असा सण एकीकडे उत्साहात साजरा होत असताना दुसरीकडे या सणावर पाणी सोडत शेतकºयांनी पीकविमा भरण्यासाठी रात्री मुक्कामी राहून बँकेसमोर उभे राहून हा सण साजरा करण्याचे विदारक चित्र मुखेड, लोहा आदी तालुक्यात पहावयास मिळाले़
३१ जुलै ही पीक विमा भरण्याची शेवटची तारीख असल्याने शेतकºयांनी मुखेड येथील स्टेट बँक आॅफ इंडिया, सेंट्रल बँक आॅफ इंडियासमोर मोठी गर्दी केली़ आॅनलाईन सेवा व्यवस्थित चालत नसल्याने कामे खोळंबत आहेत़ त्यामुळे संतप्त शेतकºयांनी दुसºया दिवशीही मुखेडात रास्ता रोको केला़ शेतकºयांचा विमा आॅफलाईन भरून द्यावा असे आदेश प्रशासनाने दिले असतानाही बँकांनी तो धुडकावल्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरून असंतोष व्यक्त करीत होते़ बँकांच्या विरोधात शेतकºयांनी निदर्शने केली़ याची दखल घेवून पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाणे, नायब तहसीलदार पी़डी़ गंगनर आदींनी बँक अधिकाºयांची भेट घेवून परिस्थिती समजावून सांगितली व आॅनलाईन ऐवजी आॅफलाईन अर्ज घेण्यास सुरुवात केल्याने परिस्थिती निवळून वाहतूकही सुरळीत झाली़ याकामी बालाजी कबनूरकर, वसंत संबुटवाड, डॉ़श्रावण रॅपनवाड, शिवाजी राठोड, अशोक गजलवाड, नगरसेवक विनोद आडेपवार, राजकुमार बामणे, गंगाधर पिटलेवाड, दिलीप कोडगिरे, शिवकुमार बंडे, सुनील अरगिळे, शिवाजी गेडेवाड, संतोष इंगोले, संतोष बनसोडे, संदीप कांबळे, सुरेश वडजे, संजय वडजे, पद्मसिंह वडजे, गौसअली सलगरकर, माधव टेकाळे यांनी परिश्रम घेतले़
सर्व कामे सोडून आॅनलाईन केंद्रासमोर तसेच बँकेसमोर रांगा लावून बसण्याची वेळ आल्याने शेतकरी रडकुंडीला आला़ बँक केवळ सकाळी ११ ते २ या कालावधीत पीक विमा भरून घेत असल्याने बँक प्रशासन व शेतकºयांत खटके उडत आहेत़ सीएससी केंद्र चालक जादा रक्कम उकळत असल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत़ लोहा शहरात जवळपास १० ते २० सीएससी आॅनलाईन केंद्र आहेत़ पेरणीपासून ते काढणीनंतर पुढील १४ दिवसापर्यंत पिकांना पंतप्रधान पीक योजनेचा लाभ होणार असून निसर्गच्या लहरी कारभारापासून पिकांना विमा संरक्षण मिळावे यासाठी पीक विमा काढण्याकडे शेतकºयांचा ओढा मोठ्या प्रमाणात वाढला आहे़