साडू, मेव्हण्यानेच केली ‘वाटमारी’
By Admin | Updated: August 28, 2014 00:23 IST2014-08-28T00:11:38+5:302014-08-28T00:23:19+5:30
औरंगाबाद : घर विक्री केल्यानंतर त्यातून मिळालेले दोन लाख रुपये घेऊन घराकडे जाणाऱ्या व्यक्तीला त्याच्या साडू व मेव्हण्याने रस्त्यात अडवून मारहाण करून ही रक्कम हिसकावून नेली.

साडू, मेव्हण्यानेच केली ‘वाटमारी’
औरंगाबाद : घर विक्री केल्यानंतर त्यातून मिळालेले दोन लाख रुपये घेऊन घराकडे जाणाऱ्या व्यक्तीला त्याच्या साडू व मेव्हण्याने रस्त्यात अडवून मारहाण करून ही रक्कम हिसकावून नेली. ही घटना मंगळवारी सायंकाळी टाइम्स कॉलनीत घडली.
पोलिसांनी सांगितले की, युनूस कॉलनीतील मोहंमद जहीर मोहंमद शब्बीर यांच्या पत्नीच्या नावावर एक घर होते. हे घर विकून त्यातून आलेली रक्कम निम्मी वाटून घेऊ, असे जहीर व त्यांचा साडू सय्यद तस्लीम (रा. हर्षनगर) यांच्यात ठरलेले होते. काल चार लाखांमध्ये ते घर विकण्यात आले. त्यातील दोन लाख रुपये जहीर यांनी स्वत:कडे ठेवले. तर उर्वरित पैसे साडूला दिले. रजिस्ट्री कार्यालयातून घराकडे येण्यासाठी निघाले.
टाइम्स कॉलनीजवळ साडू सय्यद तस्लीम, मेव्हणा इरफान ऊर्फ गोजू व त्यांच्या दोन साथीदारांनी जहीर यांची दुचाकी अडविली आणि मारहाण करून जहीर यांच्याकडील दोन लाख रुपयांची रोख रक्कम हिसकावली. या प्रकरणी जिन्सी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून फौजदार रवींद्र बागूल हे तपास करीत आहेत.