शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

सदाभाऊ खोत यांचे हेलिकॉप्टर तासभर हवेतच भरकटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:19 AM

सोयगाव तालुक्यातील निंबायती येथे जालना लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या जाहीर सभेसाठी येताना राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हेलिकॉप्टरला दिशाच न मिळाल्याने ते तासभर हवेतच भरकटले.

सोयगाव : सोयगाव तालुक्यातील निंबायती येथे जालना लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या जाहीर सभेसाठी येताना राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हेलिकॉप्टरला दिशाच न मिळाल्याने ते तासभर हवेतच भरकटले.हेलिकॉप्टरने सोयगाव परिसर पिंजून काढल्याने सदाभाऊ खोत यांना तासभर हवेतच राहावे लागले. हेलिकॉप्टर लँड होण्यासाठी रात्री वेगळे आणि सकाळी वेगळे असे दोन लोकेशन मिळाल्याने हा घोळ झाल्याचे पायलट एम. बॉबी यांनी सांगितले.मुंबईवरून खासगी हेलिकॉप्टर निंबायतीकडे येत असताना पायलटला सोमवारी रात्री सोयगाव आणि मंगळवारी सकाळी रामपुरा असे वेगवेगळे दोन लोकेशन मिळाल्याने पायलटला हेलिकॉप्टरसह सोयगाव आणि गलवाडा गावावर घिरट्या घालाव्या लागल्या. जिल्ह्याच्या नकाशातच नसलेले रामपुराचे लोकेशन न मिळाल्याने गोंधळ उडाला होता. तासभर हेलिकॉप्टर हवेतच असल्याचे पाहून अखेर भाजपचे पदाधिकारी व संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी धूर करून हेलिकॉप्टरला अजिंठा डोंगराच्या पायथ्याजवळ रामपुरा गावाचे लोकेशन दिले. त्यानंतर हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरले व सदाभाऊ खोत सभास्थानी पोहोचले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Politicsराजकारण