‘एस. टी.’ देशात नंबर वन

By Admin | Updated: July 29, 2016 01:10 IST2016-07-29T01:00:20+5:302016-07-29T01:10:35+5:30

औरंगाबाद : एस. टी. महामंडळ अन्य राज्यांतील महामंडळाच्या तुलनेत क्रमांक एकवर आहे. मात्र, येथील कर्मचाऱ्यांना अन्य महामंडळांच्या तुलनेत कमी वेतन आहे

'S. T. 'Number One' in the country | ‘एस. टी.’ देशात नंबर वन

‘एस. टी.’ देशात नंबर वन


औरंगाबाद : एस. टी. महामंडळ अन्य राज्यांतील महामंडळाच्या तुलनेत क्रमांक एकवर आहे. मात्र, येथील कर्मचाऱ्यांना अन्य महामंडळांच्या तुलनेत कमी वेतन आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी नोकरी सोडून देतात. या परिस्थितीचा राज्यभर अभ्यास करून वेतनश्रेणीसंदर्भात अहवाल देण्यासाठी अभ्यास गट स्थापन केला आहे. या गटाने बुधवारी औरंगाबादेतील अधिकारी- कर्मचाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला. या अभ्यासामुळे लवकरच भरघोस वेतन मिळेल, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कामगार वेतनश्रेणी अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली आहे. या अभ्यास गटाचे अध्यक्ष डी. आर. परिहार, सदस्य रवींद्र धोंडगे, डी. आर. मोरे, शि. म. म्हात्रे, बा. मा. जाधव यांनी बुधवारी औरंगाबाद शहरातून वेतनाच्या परिस्थितीचा आढाव्यास प्रारंभ केला. एस. टी. महामंडळाच्या राज्यभरात १८ हजारांवर बसेस आहेत. तर १ लाख १० हजारांवर कर्मचारी आहेत. त्यामुळे दुसऱ्या राज्यांमधील परिस्थिती बघता आज एस. टी. महामंडळ देशात क्रमांक एकवर आहे. एस. टी. महामंडळ चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत या अभ्यास गटाने अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
श्रमाप्र्रमाणे वेतन कसे मिळेल, उत्पादकता कशी वाढविता येईल, यासाठी आगामी चार महिने अभ्यास केला जाणार आहे. कार्यशाळेचे व्यवस्थापक प्रकाश पाटील, राडीकर यांच्यासह साहेबराव निकम, शेख तालेब ताहेर आदी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Web Title: 'S. T. 'Number One' in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.