परतुरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट
By Admin | Updated: October 29, 2015 00:15 IST2015-10-29T00:08:10+5:302015-10-29T00:15:39+5:30
परतूर : परतूर शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला असून ही जनावरे रात्री शेतातील पीके नष्ट करून दिवसभर शहरातील रोडवर ठिय्या मांडतात

परतुरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट
परतूर : परतूर शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला असून ही जनावरे रात्री शेतातील पीके नष्ट करून दिवसभर शहरातील रोडवर ठिय्या मांडतात व वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. यामुळे अपघातेचही प्रमाण वाढल्ो आहे.
परतूर शहरात मोकाट जनावरांची संख्या दिवसे दिवस वाढत आहे. ही वाढती संख्या शेतकरी, वाहन धारक व नागरीकांना डोकेदूखी ठरत आहेत. ही जनावरे रात्री पिकांची नासाडी करतात. तर दिवसा रोडवर धुमाकूळ घालतात. तसेच ही जनावरे कळपानेच फिरत असल्याने एखादया शेतकऱ्याच्या पिकात गेली की, पुर्ण पिकाची नासधूस करतात. अगोदरच दुष्काळी परिस्थितीने हवालदिल झालेला शेतकरी या मोकाट जनावरांच्या उपद्रवाने अधिकच त्रस्त झाला आहे. शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान करण्याबरोबरच ही जनावरे दिवसभर शहरात मुख्य रोडवर बसून राहतात. यामुळे बऱ्याचदा ट्राफिक जॅम होते.
या जनावराच्या टकरीतुनही रोडवर अपघात घडतात. या जनावरांनी बऱ्याचदा महिला व मुलांना जख्मी केले आहे. (वार्ताहर)