जिल्हा अॅक्वाथलॉन स्पर्धेत रूपाली, प्रणव, श्रेयस, आशिष, सानिका अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:35 IST2017-11-16T00:35:06+5:302017-11-16T00:35:25+5:30
नुकत्याच झालेल्या जिल्हा अॅक्वाथलॉन स्पर्धेत रूपाली पानसे, प्रणव कवडे, श्रेयस निरवळ, आशिष जाधव, श्रीराम लोमटे, सानिका झोपे यांनी आपापल्या गटात अव्वल स्थान पटकावले.

जिल्हा अॅक्वाथलॉन स्पर्धेत रूपाली, प्रणव, श्रेयस, आशिष, सानिका अव्वल
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : नुकत्याच झालेल्या जिल्हा अॅक्वाथलॉन स्पर्धेत रूपाली पानसे, प्रणव कवडे, श्रेयस निरवळ, आशिष जाधव, श्रीराम लोमटे, सानिका झोपे यांनी आपापल्या गटात अव्वल स्थान पटकावले.
या स्पर्धेत ८० खेळाडूंनी सहभाग नोंदवला. अॅक्वाथलॉनमध्ये ३०० मीटर स्विमिंग, ४ कि.मी. रनिंग याचा समावेश होता.
निकाल (१२ वर्षांखालील) : १. प्रणव कवडे, २. रुद्राक्ष ठाकरे, ३. रोहन सोनवणे, ४. अथर्व माळी, ५. श्लोक देवकर, ६. अनुज सूर्यवंशी. १८ वर्षांखालील : १. श्रेयस निरवळ, २. अभिरभानू धारवाडकर, ३. अजयसिंह पाल, ४. अर्जुन बारवाल, ५. प्रतिष देशपांडे, ६. शौनक जोशी. ४० वर्षांखाली पुरुष गट : १. आशिष जाधव, २. किशोर राऊत, ३. सुशांत मगर, ४. भूषण रावेरकर, ५. बाळासाहेब त्रिभुवन, ६. प्रफुल्ल जटाळे. ४१ वर्षांवरील गट : १. श्रीराम लोमटे, २. रमेश मोरे, ३. अंबादास पिसोळकर, ४. रुस्तुम तुपे, ५. सुहास देशपांडे. मुलींचा गट (१८ वर्षांखालील) : १. सानिका झोपे, २. दिव्यानी सूर्यवंशी, ३. मनवा मेहता, ४. तनिष्का जिव्हाडे, ५. गौरी मार्कंडे. महिला गट : १. रूपाली पानसे, २. सीमा यादव, ३. स्वाती जिव्हाडे, ४. प्रियंका गिरी, ५. वैशाली गोरे, ६. अश्विनी मार्कंडे. तत्पूर्वी, स्पर्धेचे उद्घाटन डॉ. विजय व्यवहारे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मोहंमद कदीर खान, अब्दुला खान, इरफान अमोदी, राज्य ट्रायथलॉन संघटनेचे कोषाध्यक्ष अभय देशमुख, स्पर्धा सचिव अंकुशसिंह पाल, डॉ. संदीप जगताप, चरणसिंग संघ आदी उपस्थित होते. बक्षीस वितरण लौकिक कोरेगावकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी भगवान माळी, नितीन झोपे उपस्थित होते. याप्रसंगी प्रशिक्षक मुकेश बाशा, आनंद धारवाडकर, पद्मा धारवाडकर, अनिकेत देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.