शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'राज्य चालवणे हे येड्या गबाळ्याचे काम नव्हे...' - रावसाहेब दानवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2020 17:44 IST

Raosaheb Danave : सरकार नेमक कोण चालवते, निर्णय कोण घेतो हेच कळतच नाही.

ठळक मुद्देसंकटाच्या काळात मुख्यमंत्री 'मी आणि माझे कुटुंब' म्हणत घरातकृषी कायद्याला दिलेली स्थगितीही बेकायदेशीररित्या

पैठण : कोरोना महामारीत राज्यकर्त्यांनी दौरे करून जनतेला दिलासा दिला पाहिजे. मात्र, राज्याचे मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे, 'मी आणि माझे कुटुंब'  असे म्हणत घरात बसले आहेत. 'राज्य चालवणे हे येड्या गबाळ्याचे काम नव्हे...', अशा शब्दात राज्यातील आघाडी सरकारच्या कामकाजाचे वाभाडे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आज पैठण येथे काढले. ते शहरातील विविध विकास कामांच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. 

पुढे बोलताना केंद्रीय मंत्री दानवे म्हणाले, राज्यातील आघाडी सरकारहे अमर-अकबर-अँथनी सरकार आहे. सरकार नेमक कोण चालवते, निर्णय कोण घेतो हेच कळतच नाही. राज्यावर आलेल्या संकटाच्या काळात माजी मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपाचे पदाधिकारी राज्यभर दौरे करित आहेत. तर दुसरीकडे मात्र, 'मी आणि माझे कुटुंब' म्हणत राज्याचे प्रमुख घरात बसल्याचे दुर्दैव राज्यातील जनतेला पहावे लागत असल्याची टीकाही दानवे यांनी यावेळी केली. 

कृषी कायदा शेतकरी हिताचाकेंदाचा नवीन कृषी कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा असून बाजार समितीच्या अस्तित्वाला कुठेही धक्का लागणार नाही. मात्र, बाजार समितीच्या आडून शेतकऱ्यांची होणारी लूट मात्र थांबणार आहे. आघाडी सरकारने या कायद्याला विरोध केला असून राज्यात कायद्याला दिलेली स्थगिती ही बेकायदेशीररित्या आहे, असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

आषाढी एकादशीला पंढरपूर सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नाथमहाराजांची पालखी गोदावरी काठावर असलेल्या  पालखी ओट्यावर भाविकांच्या दर्शनासाठी ठेवली जाते. याच ठिकाणी पैठणकर जमा होऊन पालखीस निरोप देतात. या पालखी ओट्याचे सुशोभीकरण व अन्य विकास कामे दोन कोटी रूपये खर्चून करण्यात येत आहे. या विकास कामाचे भूमिपूजन  आज केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनिल बोंडे, नगराध्यक्ष सुरज लोळगे, जिल्हाध्यक्ष विजय औताडे, प्रदेश उपाध्यक्ष रेखाताई कुलकर्णी, अश्विनी लखमले, तालुकाध्यक्ष डॉ सुनील शिंदे, शहराध्यक्ष शेखर पाटील, महेश जोशी, लक्ष्मण औटे,  बद्रीनारायण भुमरे, अँड कांतराव औटे,बप्पा शेळके, सुनील रासणे, बाळू माने, विजय चाटुपळे, नम्रता पटेल, सुलोचना साळुंके, आबा बरकसे, बंडू आंधळे, सतिश आहेर आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेChief Ministerमुख्यमंत्रीUddhav Thackerayउद्धव ठाकरेAurangabadऔरंगाबाद