आज धावणार सचखंड एक्सप्रेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 00:26 IST2017-08-29T00:26:31+5:302017-08-29T00:26:31+5:30
थून धावणाºया सचखंड एक्स्प्रेससह इतर गाड्या मागील तीन दिवसांपासून रद्द करण्यात येत होत्या, परंतु उत्तर भारतातील परिस्थिती पूर्वपदावर आल्याने २९ आॅगस्ट रोजी सुटणारी श्री हुजूर साहिब नांदेड - अमृतसर सचखंड एक्स्प्रेस आपल्या निर्धारित वेळेत नांदेड स्थानकातून सुटेल़

आज धावणार सचखंड एक्सप्रेस
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: येथून धावणाºया सचखंड एक्स्प्रेससह इतर गाड्या मागील तीन दिवसांपासून रद्द करण्यात येत होत्या, परंतु उत्तर भारतातील परिस्थिती पूर्वपदावर आल्याने २९ आॅगस्ट रोजी सुटणारी श्री हुजूर साहिब नांदेड - अमृतसर सचखंड एक्स्प्रेस आपल्या निर्धारित वेळेत नांदेड स्थानकातून सुटेल़
डेरा सच्चा सौदा यांच्या अनुयायांमुळे कायदा आणि सुरक्षेची समस्या उद्भवल्याने उत्तर भारतातून धावणाºया गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले होते़ त्यामुळे अनेक गाड्या रद्द झाल्या तर काही गाड्या विलंबाने धावल्या़ २८ आॅगस्ट रोजी अमृतसरवरून सुटणारी आणि नांदेडकडे येणाºया दोन्ही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
उत्तर रेल्वेची परिस्थिती पूर्वपदावर आल्याने नांदेड येथून २९ आॅगस्ट रोजी सुटणारी गाडी संख्या १२७१५ नांदेड - अमृतसर सचखंड एक्स्प्रेस आपल्या नियमित वेळेवर नांदेड स्थानकातून सुटेल़ तर गाडी संख्या १२४२२ अमृतसर ते हु. सा. नांदेड सचखंड एक्स्प्रेस आणि गाडी संख्या १२७१५ अमृतसर ते नांदेड सचखंड एक्स्प्रेस २८ आॅगस्ट रोजी निघाली नसल्यामुळे २९ आॅगस्ट रोजी दोन्ही गाड्या नांदेड विभागात येणार नाही.