शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पावसासाठी देवाकडे धावा

By admin | Updated: July 7, 2015 00:56 IST

औरंगाबाद : मराठवाडा मागील तीन वर्षांपासून सतत दुष्काळाचा सामना करीत असून, यावर्षी वेळेत पावसाचे आगमन झाले असले तरी पेरण्या झाल्यानंतर पावसाने दडी मारली आहे.

औरंगाबाद : मराठवाडा मागील तीन वर्षांपासून सतत दुष्काळाचा सामना करीत असून, यावर्षी वेळेत पावसाचे आगमन झाले असले तरी पेरण्या झाल्यानंतर पावसाने दडी मारली आहे. पावसासाठी देवाकडे प्रार्थना करणे आणि शेतकऱ्यांनी धैर्याने परिस्थितीला सामोरे जाण्यापलीकडे दुसरा पर्याय नसल्याचे मत विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. उपलब्ध पाण्याचा वापर करून आहेत ती पिके वाचविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात येत आहे. विभागात ५० टक्क्यांच्या आसपास पेरण्या झालेल्या आहेत. काही जिल्ह्यांत पेरण्या झाल्या आहेत, तर काही जिल्ह्यांत झाल्याच नाहीत. उडीद, मुगाचे कमी उत्पादन होण्याची शक्यता आहे. तर तूर, बाजरी, सोयाबीनचे उत्पादन सरासरी गाठेल. पाऊस १५ ते ३० दिवस लांबला तर कराव्या लागणाऱ्या प्रशासकीय नियोजनाचा आराखडा तयार आहे, असेही ते म्हणाले. निसर्गासमोर प्रशासकीय यंत्रणादेखील हतबल झाली असून, संकटांचा सामना करण्यासाठी जनमानसांचे धैर्य वाढविण्यासाठी विभागीय पातळीवर प्रशासकीय यंत्रणा काम करीत आहे. आयुक्त म्हणाले, अधूनमधून अशा प्रकारे दुष्काळी परिस्थिती निर्माण होतेच. कधी पाऊस उशिरा येतो, तर कधी वेळेत पडतो. येणाऱ्या संकटांना धैर्याने सामोरे जाणे गरजेचे आहे. तसेच देवाकडे प्रार्थनादेखील करावीच लागेल. पिकांची जोपासना केली जात आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर तातडीच्या उपाययोजना करणे शक्य नसते. जलयुक्त शिवारसारख्या योजनांमुळे फायदा होतो आहे. त्यावर आणखी दूरगामी काम करावे लागणार आहे. मराठवाडा विभागात कमी पाऊस पडला असल्यामुळे कृत्रिम पाऊस पाडण्याची घोषणा शासनाने केली आहे. याप्रकरणी नियोजनासंबंधी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. विभागाचे ७७९ मि. मी. इतके पर्जन्यमान आहे. १२१ मि. मी. इतका पाऊस महिनाभरात झाला आहे. ४उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी जिल्ह्यांत कमी पाऊस झाला आहे. पाऊस लांबला तर देवाकडे धावा करण्याविना पर्याय नसल्याचे आयुक्त म्हणाले.