शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्याची अफवाच; बायकोला शिट्या मारतो म्हणून तरुणाचा केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 16:00 IST

लिफ्ट मागत शेतात गेला सोबत अन् केला खून; पोलिसांनी आरोपीस ठोकल्या २४ तासाच्या आत बेड्या

- श्यामकुमार पुरेसिल्लोड:(जि. औरंगाबाद) नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी  १ जानेवारीला शेतात गव्हाला पाणी भरण्यास व मटण पार्टीस जाणाऱ्या एका २८ वर्षीय तरुणाचा आरोपीने चाकूने हल्ला करून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.तत्पूर्वी त्याच्यावर बिबट्याने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची अफवा सिल्लोड तालुक्यातील रेलगाव येथे पसरली होती मात्र तो बिबट्याचा हल्ला नसून त्याचा आरोपीनेखून केला असल्याची माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे.पोलिसांनी आरोपीस २४ तासाच्या आत जेरबंद केले आहे.

 या घटनेत मयत झालेल्या तरुण युवकाचे नाव रवींद्र अंबादास काजले वय २८ रा रेलगाव असे आहे.तर त्याचा ज्या आरोपीने खून केला त्याचे नाव गणेश कैलास चव्हाण वय २४ वर्ष रा.रेलगाव असे आहे.मायताचा भाऊ समाधान अंबादास याने दिलेल्या फैर्यादी वरून पोलिसांनी सोमवारी रात्री ७.३३ वाजता खुनाचा गुन्हा दाखल केला होता.तर हा खून १ जानेवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमाराला रोलगाव ते रेलगाववाडी रोडवर झाला होता.पोलिसांनी आरोपीस सोमवारी मध्यरात्री बेड्या ठोकल्या...

तो बायकोला शिट्या मारत होता.. मयत  रवींद्र हा आरोपी गणेशच्या  बायकोला  गल्लीतून जाता येता वाईट नजरेने बघत होता तिला शिट्या मारत होता..गणेश ने त्याला अनेक वेळा समजावले असे करू नको पण मयताने ऐकले नाही उलट तुला काय करायचे ते करून घे असे सांगितले म्हणून रागाच्या भरात गणेश ने रवींद्रचा काटा काढल्याची कबुली आरोपीने पोलिसांकडे दिली आहे.ज्या ठिकाणी हा खून झाला त्या ठिकाणी आरोपी चा मोबाईल पडला होता.व तो गुन्हा घडला तेव्हा पासून गावातून फरार झाला होता. त्या मोबाईल च्या माहिती वरून पोलिसांनी या गुन्ह्याचा शोध लावला.

मोटार सायकल वर लिफ्ट मागितली..सदर शेतकरी रवींद्र हा गव्हाला पाणी देण्यासाठी व पार्टी करण्यासाठी घरातून भाकरी व मटण घेऊन मोटार सायकल होंडा शाहीन क्रमांक एम एच २० डि वाय ०५८५ वर शेतात जात होता .त्याला रस्त्यात रोखून आरोपीने लिफ्ट मागितली. आणि रस्त्यात त्याच्यावर चाकूने हल्ला करून त्याचा खून केला.

२४ तासाच्या आत गुन्हा उघडसदर शेतकरी बिबट्याच्या हल्यात ठार झाल्याची माहिती आधी पोलिसांना मिळाली होती मात्र घटनास्थळी तशी स्थिती दिसत नव्हती त्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे वाटत होतं.मात्र घटनास्थळी मिळालेल्या मोबाईल वरून या घटनेचा तपास करण्यास मोठी मदत मिळाली. व आरोपीस २४ तासात पकडता आले.- सीताराम मेहेत्रे पोलीस निरीक्षक सिल्लोड ग्रामीण.

यांनी केली कारवाईही कार्यवाही पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे, फौजदार विकास आढे,पोलीस कर्मचारी सचिन सोनार, अनंत जोशी,कैलास द्वारकुंडे,ज्ञानदेव ढाकणे,रंगराव बावस्कर, यतीन कुलकर्णी, मंगेश राठोड यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद