‘खडकी गँग’च्या आवळल्या मुसक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:52 IST2017-12-02T00:52:49+5:302017-12-02T00:52:55+5:30
बंगल्यांच्या लाकडी खिडक्यांचे पट काढून चोºया करणाºया ‘खिडकी गँग’च्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी रात्री यश आले.

‘खडकी गँग’च्या आवळल्या मुसक्या
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : बंगल्यांच्या लाकडी खिडक्यांचे पट काढून चोºया करणाºया ‘खिडकी गँग’च्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी रात्री यश आले. वाळूज रोडवर आठ ते दहा किलोमीटर पाठलाग करून पोलिसांनी त्यांना पकडले. या चोरट्यांनी शहरात सात ते आठ बंगल्यांत घरफोड्या केल्याची कबुली दिली.
सय्यद सिकंदर सय्यद अख्तर (३५, रा. महंमदिया कॉलनी, बीड), सय्यद सिराज सय्यद लियाकत (३२, रा. पूरग्रस्त कॉलनी, बीड, ह.मु. वडगाव गुप्ता, अहमदनगर) आणि शेख बबलू शेख रहेमान (३१, रा.नागापूर एमआयडीसी, दांगट मळा, अहमदनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे म्हणाले की, शहरातील सिडको एन-३, एन-४, व्यंकटेशननगर, सिडको एन-१ आदी वसाहतींमधील बंगल्यांच्या खिडक्या तोडून चोरट्यांनी लाखो रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याच्या घटना गेल्या काही दिवसांत घडल्या. या गुन्ह्यांच्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे पोलीस तपास करीत असताना घरफोड्या करणारी टोळी कारने वाळूज रोडने शहरात येत असल्याची माहिती खबºयाने पोलिसांना दिली. यानंतर पोलीस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, सहायक आयुक्त रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी गस्तीवर असलेले सहायक पोलीस निरीक्षक अजबसिंग जारवाल, पोहेकॉ शिवाजी झिने, विलास वाघ, राजेंद्र साळुंके, रवी दाभाडे, विशाल सोनवणे, देवचंद महेर, गजानन मांटे, सुनील धात्रक, प्रभाकर राऊत, चालक थोरे यांनी रात्री ९ वाजेच्या सुमारास वाळूज रोडवर सापळा रचला. यावेळी संशयित कार दिसताच पोलिसांनी चालकाला गाडी थांबविण्याचा इशारा केला; मात्र कारचालक न थांबता पुढे निघाला. यानंतर पोलिसांचा संशय बळावला आणि पोलिसांनी तब्बल आठ ते दहा किलोमीटर पाठलाग करून कारसमोर पोलिसांची जीप आडवी लावून त्यांना पकडले. पोलिसांनी फिल्मीस्टाईल त्यांच्यावर धावा बोलताच आरोपींना प्र्रतिकार करता आला नाही. यावेळी त्यांच्या कारची झडती घेतली असता त्यांच्याजवळ स्क्रू ड्रायव्हर, लहान टॉमी, रोख रक्कम, मोबाइल असा ऐवज मिळाला. त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी गुन्हे शाखेत आणले. तेथे त्यांची कसून चौकशी केली असता ते अट्टल चोरटे असल्याचे समोर आले.
६ घरे फोडल्याची कबुली
खिडकी गँगला पोलिसांनी विचारपूस करताच त्यांनी सिडको एन-३ येथील संजय नानाजी दराडे या व्यापाºयाच्या बंगल्यात ते आणि त्यांची आई झोपलेली असताना १६ नोव्हेंबर रोजी त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली.
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या या घटनेत चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख असा सुमारे १ लाख ४७ हजारांचा ऐवज लंपास केला. यासोबतच सिडको एन-३ येथे बंगल्यात भाड्याने राहणारे संपूर्ण कुटुंब घरात झोपलेले असताना रात्री अडीच वाजेच्या सुमारास खिडकीचे स्क्रू काढून आत प्रवेश केला आणि त्यांनी सुमारे तीन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम पळविली.
यावेळी एका चोरट्याची स्लीपर चप्पल घटनास्थळी राहिली होती. या बंगल्याशेजारील अन्य एका बंगल्यात त्यांनी चोरीचा प्रयत्न केला; मात्र तेथे त्यांच्या हाती काहीच लागले नव्हते. व्यंकटेशनगर येथील कृषी अधिकारी अंकुशराव गुलाबराव कोलते यांच्या बंगलाची खिडकी काढून चोरट्यांनी रोख १ लाख रुपये आणि सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे पाच लाखांचा ऐवज चोरून नेल्याची कबुली दिली. याशिवाय निवृत्त पोलीस अधिकारी कटके यांच्या बंगल्यात आणि एन-१ येथील बंगल्यात चोरी केल्याची कबुली दिली.