१३ दिवसांपासून एटीएममध्ये खडखडाट

By Admin | Updated: June 14, 2017 00:38 IST2017-06-14T00:33:20+5:302017-06-14T00:38:17+5:30

औरंगाबाद :बहुतांश एटीएममध्ये खडखडाट आहे.

Rumble on ATM from 13 days | १३ दिवसांपासून एटीएममध्ये खडखडाट

१३ दिवसांपासून एटीएममध्ये खडखडाट

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जून महिन्याची १३ तारीख उलटली, पण अजूनही रिझर्व्ह बँकेने शहरासाठी नोटांचे कंटेनर पाठविले नाही. यामुळे बहुतांश एटीएममध्ये खडखडाट आहे.
पगारी आठवडा संपत आला आहे; मात्र अनेक कर्मचाऱ्यांच्या हाती अजूनही पूर्ण पगार मिळाला नाही, कारण एटीएममध्ये नोटाच नाहीत. काही राष्ट्रीयीकृत बँकांंचा अपवाद वगळला तर अनेक बँकांमध्ये पूर्ण रक्कम दिली जात नाही. काही बँका परजिल्ह्यातील बँकांमधून रक्कम मागवून दररोजचे व्यवहार पूर्ण करीत आहेत. रक्कम मिळण्याची शाश्वती नसल्याने अनेकांनी आता बँकेत पैसे जमा करण्यापासून हात आखडता घेतला आहे.

Web Title: Rumble on ATM from 13 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.