खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळणी !
By Admin | Updated: August 20, 2016 00:52 IST2016-08-20T00:44:00+5:302016-08-20T00:52:18+5:30
लातूर : शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ मोठाले खड्डे असून, रस्त्याला जणू चाळणीचीच गत आली आहे. पीव्हीआर चौक ते गरुड चौक, गरुड चौक ते शिवाजी चौक,

खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळणी !
लातूर : शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ मोठाले खड्डे असून, रस्त्याला जणू चाळणीचीच गत आली आहे. पीव्हीआर चौक ते गरुड चौक, गरुड चौक ते शिवाजी चौक, शिवाजी चौक ते राजीव गांधी चौक आणि शिवाजी चौक ते रेणापूर नाका चौकापर्यंत मोठ मोठाले १ हजार ७२५ खड्डे आहेत. तर छोटे ९ हजार १५२ खड्डे आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त झाले असून, वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ‘लोकमत’ने शहरातील या मुख्य रस्त्यांच्या खड्ड्यांची मोजणी केली असता ही बाब निदर्शनास आली आहे.
पीव्हीआर चौक ते शिवाजी चौकापर्यंत १८८ मोठे खड्डे असून, २३५ छोट्या खड्ड्यांचा समावेश आहे. शिवाजी चौक ते गांधी चौकापर्यंत ८० मोठे खड्डे आहेत. तर १३५ छोट्या खड्ड्यांचा समावेश आहे. मिनी मार्केट ते सर्वोपचार रुग्णालयापर्यंत ४० मोठ्या खड्ड्यांचा समावेश आहे. या खड्ड्यांमुळे अनेकवेळा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. गांधी चौक ते गंजगोलाईपर्यंत सिमेंट काँक्रिटचे रस्ते आहेत. मात्र सिमेंटचे गट्टू रस्त्याबाहेर निघाले आहेत. त्यामुळे खड्डे पडले आहेत. शाहू चौक ते गरुड चौकापर्यंत मोठे ३४ खड्डे पडले आहेत. तर छोटे १४० खड्डे आहेत. गरुड चौक ते आंबेडकर चौकापर्यंत ११० खड्डे आहेत. या रस्त्यावर छोटे खड्डे तर अगणित असल्यासारखेच आहेत. यामुळे वाहने खिळखिळे तर होतातच, शिवाय अपघातही घडत आहेत.