शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

रुद्रेश्वर बंधाऱ्याच्या भिंतीला धोका

By admin | Updated: September 14, 2014 00:20 IST

सोयगाव : येथून जवळच असलेल्या रुद्रेश्वर बंधाऱ्यात पाण्याची पातळी वाढली असून, सांडव्यातून पाणी निघत नसल्यामुळे बंधाऱ्याच्या भिंतीला धोका निर्माण झालेला आहे.

सोयगाव : येथून जवळच असलेल्या रुद्रेश्वर बंधाऱ्यात पाण्याची पातळी वाढली असून, सांडव्यातून पाणी निघत नसल्यामुळे बंधाऱ्याच्या भिंतीला धोका निर्माण झालेला आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असून, गलवाडा येथील ग्रामस्थांनी चारी खोदून पाणी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.सोयगाव येथून जवळच गलवाडा गावाजवळ रुद्रेश्वर लेणीच्या पायथ्याशी एक पाझर तलाव आहे. लघु पाटबंधारे विभागाचा हा बंधारा सन १९९२ नंतर पहिल्यांदाच भरला. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या पाझर तलावात यंदा प्रचंड पाणी साचले. तलावाला मोठ्या धरणाचे स्वरूप आले आहे. या तलावाचा सांडवा चुकीच्या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे, त्यामुळे सांडव्यावरून पाणी वाहत नाही. आतापर्यंत जास्त पाणी न आल्यामुळे धोका जाणवला नाही; परंतु ७ व ८ रोजी झालेल्या पावसामुळे धरणात पाण्याची पातळी वाढली. सांडव्यातून पाणी निघत नसल्यामुळे भिंतीच्या पिचिंगच्या किती तरी वर पाणी आले. दररोज पाणी वाढत आहे; परंतु पाणी बाहेर निघण्यास वाव नसल्याने भिंतीला धोका निर्माण झाला आहे. धरणाखालील शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. असेच पाणी वाढत राहिल्यास भिंतीवरून पाणी जाऊन धरण फुटण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. धरणातील पाणी पाहता धरणाखालील शेतीसह गलवाडा गावालादेखील या धरणापासून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांनी सरपंच जीवन पाटील व मंडळ अधिकारी व्ही. टी. जाधव यांच्याकडे समस्या मांडली, तेव्हा जेसीबीच्या साहाय्याने चारी खोदून पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला. नंदू हजारी, विजय बिर्ला, कैलास इंगळे, दत्तू इंगळे, अशोक इंगळे, धनराज औरंगे, मुन्ना ढगे, रमेश गव्हांडे आदींनी चारी खोदून पाणी बाहेर काढले. या धरणाकडे विशेष लक्ष देऊन सांडव्याद्वारे पाणी कसे बाहेर पडेल, यासाठी तालुका प्रशासनाने उपाययोजना राबविण्याची मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी केली आहे.