शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

‘समृद्धी’वरून सुसाट जाल तर वाजणार आरटीओचा ‘सायरन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 07:03 IST

वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांचे अर्धा तास समुपदेशन

लोकमत न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर ताशी १२० कि.मी.ची वेगमर्यादा आहे. परंतु, अनेक वाहनचालक यापेक्षा अधिक वेगाने वाहन पळवत आहेत. अशा सुसाट वाहनांचे चित्रण अद्ययावत यंत्रणेद्वारे टिपले जात आहे. इतकेच नाही तर वाहनचालक ज्या ठिकाणाहून समृद्धी महामार्गावरून बाहेर पडतील, तेथे सायरन वाजतो. या सुसाट वाहनचालकांना तेथेच थांबवून आरटीओ कार्यालयाच्या पथकाकडून आता समुपदेशन केले जात आहे. ‘समृद्धी’वर तब्बल १८० कि.मी. वेगाने वाहन चालविले जात असल्याचे आरटीओ कार्यालयाच्या निदर्शनास आले आहे. 

अतिवेगामुळेच ‘समृद्धी’वर अपघात होत असल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे अतिवेगाला पायबंद घालण्यासाठी आरटीओ कार्यालयाकडून जनजागृतीबरोबर कारवाईचा बडगाही उगारला जात आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना अर्धा तास थांबवून समुपदेशनाद्वारे वाहतूक नियमांचे आणि सुरक्षेचे धडे दिले जात आहेत.

गुळगुळीत टायर असलेली ३२१ वाहने माघारीआरटीओ कार्यालयाने गेल्या काही दिवसांत या महामार्गावर ५ हजार २८० वाहनांच्या टायरची तपासणी केली. त्यात गुळगुळीत टायर आढळलेल्या ३२१ वाहनांना परत पाठविली. 

किती जणांवर कारवाई?     अतिवेगाने जाणाऱ्या २१६ वाहनचालकांचे समुपदेशन     ‘समृद्धी’वर कुठेही वाहन उभे करणाऱ्या १४०१ वाहनांवर कारवाई     ५७० वाहनांवर ‘लेन कटिंग’ची कारवाई

पाच जणांचे पथक तैनात औरंगाबाद जिल्ह्यातून ११२ कि.मी. समृद्धी महामार्ग जात आहे. या अंतरात आरटीओ कार्यालयाच्या पथकाकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात आहे. त्यासाठी ५ जणांचे पथक आहे. एखादे वाहन ३०० मीटरवर असताना ते किती वेगात आहे, हे लक्षात येते, असे प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी सांगितले.

१६ जणांचा मृत्यू १२ जण गंभीर जिल्ह्याच्या ११२ किलोमीटरच्या हद्दीत आतापर्यंत नऊ अपघातात १६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर १२ प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत. 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गnagpurनागपूरAccidentअपघात