आरटीओ कार्यालयात वर्षानुवर्षांपासून वाहने पडून

By Admin | Updated: November 30, 2014 01:00 IST2014-11-30T00:29:52+5:302014-11-30T01:00:39+5:30

औरंगाबाद : प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) आवाराला वर्षानुवर्ष धूळखात पडलेल्या वाहनांमुळे बकाल स्वरूप आले आहे.

In the RTO office, vehicles have been running for years | आरटीओ कार्यालयात वर्षानुवर्षांपासून वाहने पडून

आरटीओ कार्यालयात वर्षानुवर्षांपासून वाहने पडून

औरंगाबाद : प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) आवाराला वर्षानुवर्ष धूळखात पडलेल्या वाहनांमुळे बकाल स्वरूप आले आहे. आरटीओ कार्यालयाला वर्षानुवर्षे ही वाहने सांभाळावी लागत असून अशा वाहनांचा निपटारा करण्याचे आव्हानही आरटीओ कार्यालयासमोर आहे. तोकड्या सुरक्षाव्यवस्थेमुळे अनेक वाहनांचे स्पेअर पार्ट गायब झाल्याचेही दिसून येते.
शहरात आरटीओ कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान जप्त केलेली अनेक वाहने कार्यालयाच्या आवारात उभी केली आहेत; परंतु वर्षानुवर्ष उभ्या असलेल्या अनेक वाहनांवर आता धूळ चढली आहे.
अनेक पावसाळे वाहने उघड्यावरच राहिल्याने आता यातील अनेक वाहने गंजली आहेत. लाल दिव्याची वाहनेही धूळखात उभी आहेत. आरटीओ कार्यालयाच्या आवारातील मोठी जागा अशा वाहनांनी व्यापली आहे. यामुळे कार्यालयाच्या परिसरालाही बकाल स्वरूप आले आहे. ही वाहने सोडण्यासाठी वाहनधारकांनी दुर्लक्ष केले.
वाहने सोडविण्यासाठी विविध बाबींवर करावा लागणारा खर्च पाहूनही वाहने न सोडविण्याकडे वाहनमालकांनी भर दिल्याचे दिसून येते. अशा विविध कारणांनी धूळखात पडलेल्या वाहनांची संख्या वाढली.
लाखोंची वाहने भंगारात
वाहन परत मिळविण्यासाठी हेलपाटे मारून वाहनधारक अनेकदा वैतागतात. त्यातूनही अनेक जण वाहन नेण्याकडे दुर्लक्ष करतात. लाखो रुपयांची वाहने अशा परिस्थितीमुळे आज भंगारात जमा झाल्याचे दिसून येत आहे.

Web Title: In the RTO office, vehicles have been running for years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.