आरटीओ कार्यालयाचे पथक निवडणूक कामात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:09 IST2021-01-13T04:09:13+5:302021-01-13T04:09:13+5:30
आरोग्य उपसंचालक कार्यालयात अभिवादन औरंगाबाद : आरोग्य उपसंचालक कार्यालयात मंगळवारी जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार ...

आरटीओ कार्यालयाचे पथक निवडणूक कामात
आरोग्य उपसंचालक कार्यालयात अभिवादन
औरंगाबाद : आरोग्य उपसंचालक कार्यालयात मंगळवारी जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे, सहायक संचालक डॉ. प्रदीप मुरंबीकर, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. अमोल गिते, औषध निर्माण अधिकारी वर्षा औटे, अनिल सानप, रवींद्र इराळे, आ. कृ. सोळुंके आदी उपस्थित होते.
राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) नव्या मध्यवर्ती ग्रंथालयात मंगळवारी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची साजरी करण्यात आली. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. अर्चना कल्याणकर, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. प्रीती बिराजदार, डॉ. प्रभा खैरे, डॉ. रमेश वासनिक, डॉ. मंजूषा ढवळे, डॉ. अफरोज, समाजसेवा अधीक्षक लक्ष्मीकांत शिंगोटे आदी उपस्थित होते.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीवर लोखंडी जाळी
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (घाटी) चौथ्या मजल्यावर सुरक्षेच्या दृष्टीने लोखंडी जाळी बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. २०११ पासून यासाठी पाठपुरावा केला जात होता. तब्बल १० वर्षांनंतर हे काम सुरू झाले. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिष्ठाता डॉ. भारत सोनवणे यांनी यासाठी पाठपुरावा केला.
जप्त वाहनांना पीयूसी, कारवाईची प्रतीक्षा
औरंगाबाद : आरटीओ कार्यालयाने जप्त केलेल्या वाहनांना पीयूसी देण्याचा प्रकार चार दिवसांपूर्वी समोर आला. याप्रकरणी आरटीओ कार्यालयाकडून संबंधित पीयूसी सेंटरची चौकशी केली जात आहे. चौकशीअंती कारवाई केली जाणार आहे; परंतु अद्यापही काही कारवाई झालेली नाही. चौकशीतून काय समोर येते, याकडे वाहनधारकांचे लक्ष लागले आहे.