आरटीओ कार्यालयाला आवश्यकता मनुष्यबळाची
By Admin | Updated: September 4, 2014 00:52 IST2014-09-04T00:26:47+5:302014-09-04T00:52:16+5:30
औरंगाबाद : प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी नियुक्त झाले आहेत.

आरटीओ कार्यालयाला आवश्यकता मनुष्यबळाची
औरंगाबाद : प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी नियुक्त झाले आहेत. गेल्या काही वर्षांत कार्यालयात वाहनांची नोंदणी, शिकाऊ परवाने, परवान्यांचे नूतनीकरण आदी कामे वाढली आहेत; परंतु त्या तुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या वाढलेली नाही. कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असून आरटीओ कार्यालयास कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे.
आरटीओ कार्यालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, तीन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आहेत, तर ११ मोटार वाहन निरीक्षकांची पदे असून यामध्ये बदलीहून मोटार निरीक्षक अद्याप आले नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सहायक मोटार वाहन निरीक्षकाची दोन पदे आहेत. राज्यात नुकत्याच झालेल्या भरतीमधील १०० जणांचे सध्या प्रशिक्षण सुरू आहे. प्रशिक्षणानंतर औरंगाबाद आरटीओ कार्यालयास आणखी दोन सहायक मोटार वाहन निरीक्षक मिळण्याची अपेक्षा आहे. शिवाय कार्यालयात १२ क्लर्कची पदे रिक्त आहेत.