शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

दंड न भरल्याने आरटीओने कार जप्त केली, बेरोजगार अभियंत्याने रात्रीतून चोरून नेली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 16:00 IST

वेदांतनगर पोलिसांनी केली अटक

छत्रपती संभाजीनगर : दंड प्रलंबित असल्याने आरटीओने जप्त केलेली कार विनंती करूनही न सोडल्याने बेरोजगार अभियंत्याने ती थेट रात्रीतून चोरून नेली. सोमवारी ही घटना उघडकीस आली. राहुल सुनील जठार (२८, रा. जठार वस्ती, ता. वैजापूर) असे त्याचे नाव असून, वेदांतनगर पोलिसांनी त्याला गावातून अटक केली.

तीन महिन्यांपूर्वी आरटीओच्या पथकाने राहुलची कार (एमएच ०५ बीजे १६६७) जप्त केली होती. तिच्यावर ३४ हजारांचा दंड प्रलंबित होता. त्यानंतर राहुलने ती सोडवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. मात्र, त्याला यश मिळाले नाही.आरटीओने जप्त केलेल्या त्याच्या कारसह अन्य पाच कार रेल्वेस्थानक परिसरातील कार्यालयात उभ्या केल्या होत्या. रविवारी पहाटे त्यापैकी एक कार आढळून आली नाही. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सविता पवार यांच्या तक्रारीवरून रविवारी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सीसीटीव्ही फुटेजवरून शोधनिरीक्षक प्रवीणा यादव यांच्या आदेशावरून उपनिरीक्षक वैभव मोरे, अंमलदार बाळाराम चौरे, रणजीतसिंग सुलाने, विलास डोईफोडे प्रवीण मुळे यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले केले. त्यातील चोराच्या अंगकाठीवरून पोलिसांनी कार मालकाचे घर गाठले. राहुलला ताब्यात घेतल्यानंतर त्यानेच कार चोरल्याची कबुली दिली.

कार कुठे ठेवली, सांगितलेच नाहीराहुलने रविवारी मध्यरात्री ३ वाजता बनावट चावीने आरटीओ कार्यालयात प्रवेश करून कार लंपास केली. ती कुठे ठेवली, हे मात्र त्याने पोलिसांना सांगितले नाही. राहुलने शहरातील नामांकित महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. काही महिन्यांपूर्वी तो पुण्यात नोकरी करत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्याला नाेकरी नसल्याचे तो घरीच होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद