शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई जागा गरिबांसाठी, बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश मात्र श्रीमंतांच्या मुलांना

By राम शिनगारे | Updated: July 5, 2025 19:54 IST

आरटीईनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी २५ टक्के आरक्षण आहे.

छत्रपती संभाजीनगर : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार सर्व खाजगी आस्थापनांच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा रिक्त ठेवण्यात येतात. या जागांवर आर्थिक दुर्बल घटकांसह अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन लॉटरी पद्धतीने प्रवेश देण्यात येतो. ही प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. पाचव्या फेरीतील प्रवेश पूर्ण होत आले आहेत. मात्र, या प्रक्रियेविषयी प्रचंड तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार गरिबांसाठी असलेल्या जागांवर श्रीमंतांच्या मुलांना सर्रासपणे प्रवेश मिळालेला आहे. त्यासाठी कागदपत्रांसह इतर प्रकारच्या अनियमितता करण्यात आल्याचा आरोप विविध संघटनांनी केला आहे. मात्र, त्याविरोधात काहीच कारवाई झालेली नसल्याचेही समोर आले.

आरटीईनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी २५ टक्के आरक्षण आहे. याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात सध्या आरटीई प्रवेश प्रक्रिया राबिवली जाते. यात खोटा उत्पन्नाचा दाखला आणि शाळेजवळील बनावट रहिवासी प्रमाणपत्र दाखल करून प्रवेश मिळविला जात आहे. त्यामुळे गरिबांच्या ठिकाणी श्रीमंत मुलांनाच प्रवेश मिळण्याचा धोका निर्माण झाला आहे.

आरटीईअंतर्गत किती शाळांसाठी किती अर्ज आले?छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ५६२ शाळांमधील ४ हजार ३४९ जागा आरटीईअंतर्गत रिक्त आहेत. या जागांवरील प्रवेशासाठी १६ हजार ८१९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यामुळे एका जागेसाठी चारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते.

किती विद्यार्थ्यांची निवड झाली?सध्या आरटीई प्रवेशाची पाचवी फेरी सुरू आहे. त्यात आतापर्यंत ३ हजार ७२४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे. त्याशिवाय प्रवेशासाठी निवड झालेल्या २ हजार ७३४ विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेशासाठी उत्सुकताच दाखवलेली नसल्याचे समोर आले आहे.

किती जागा रिक्त?आरटीई प्रवेशाच्या चार फेऱ्यानंतरही ६२५ पेक्षा अधिक जागा रिक्त असल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्याशिवाय प्रवेशासाठी मेसेज आलेल्या २ हजार ७३४ पालकांनीही त्याकडे पाठ फिरवली असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

प्रवेशाबाबत जिल्ह्यात किती तक्रारी?आरटीई प्रवेशामध्ये अनेक गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी पालकांसह आरटीई पालक संघाकडून शिक्षण विभागासह जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या होत्या. मात्र, या तक्रारींची दखल शासकीय यंत्रणांनी घेतलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

नेमक्या तक्रारी काय?पालकांनी अनेक शाळांमध्ये प्रवेशाचा मेसेज आल्यानंतर त्याठिकाणी सहकार्य करण्यात येत नसल्याच्या तक्रारी केलेल्या आहेत. या तक्रारींवर प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शाळा प्रशासनाशी संपर्क करीत तक्रारदारांची मदत केली. मात्र, बनावट कागदपत्रांच्या आधारे शेकडो श्रीमंतांच्या मुलांना आरटीईअंतर्गत प्रवेश मिळालेले आहेत. त्याविषयी कोणतीही दखल शासकीय यंत्रणांनी घेतलेली नाही.

तक्रारी सोडविण्यास प्राधान्यआरटीई प्रवेशासंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारींचा निपटारा करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात तक्रारी सोडविण्यास प्राधान्य दिले. स्थानिक पातळीवरील तक्रारी प्राधान्याने निकाली काढल्या आहेत.-जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरEducation Sectorशिक्षण क्षेत्र