मोबदल्यासाठी ५२५ कोटींचा प्रस्ताव
By Admin | Updated: November 14, 2015 00:53 IST2015-11-14T00:42:33+5:302015-11-14T00:53:47+5:30
औरंगाबाद : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) दुसऱ्या टप्प्यातील चार गावांतील सुमारे ९०० हेक्टर भूसंपादन करण्यासाठी ५२५ कोटी रुपये लागणार आहेत

मोबदल्यासाठी ५२५ कोटींचा प्रस्ताव
औरंगाबाद : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) दुसऱ्या टप्प्यातील चार गावांतील सुमारे ९०० हेक्टर भूसंपादन करण्यासाठी ५२५ कोटी रुपये लागणार आहेत. ती जमीन संपादित करण्यासाठी शेतकऱ्यांना मोबदला द्यावा लागणार आहे. भूसंपादनासाठी ५२५ कोटी रुपये लागतील, असा प्रस्ताव प्रशासनाने एमआयडीसीकडे पाठविला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
डीएमआयसीच्या दुसऱ्या टप्प्यात बिडकीनसह ५ गावांची २,३५१ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना १३२५ कोटींचा मोबदला दिला जात आहे. २३ लाख रुपये एकरी या भावाने मोबदला दिला जात आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी आणखी बिडकीन जवळच्या ४ गावांची ८९७ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. जांभळी ४४०.९२ हेक्टर, मेहरबान नाईक तांडा २६२.१२ हेक्टर, चिंचोली १११.९८ हेक्टर, निलजगाव ८३.६७ हेक्टर जमीन संपादित करण्यासाठी मोजणी झाली आहे. भूसंपादन अधिकाऱ्यांनी ५२५ कोटी रुपये मोबदल्यासाठी लागतील, असा प्रस्ताव एमआयडीसीकडे पाठविला असून, तो उद्योग विभागाकडे गेल्यानंतर त्याला मंजुरी मिळू शकेल.