पाणी पुरवठ्यासाठी धसांनी दिला ७० लाखांचा निधी
By Admin | Updated: September 7, 2014 00:25 IST2014-09-06T23:07:13+5:302014-09-07T00:25:11+5:30
शिरूरकासार : शिरूरकासार तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला होता. यावर मात कशी करायची? असा प्रश्न सुरूवातीच्या काळात प्रशासनालाही पडला होता.

पाणी पुरवठ्यासाठी धसांनी दिला ७० लाखांचा निधी
शिरूरकासार : शिरूरकासार तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला होता. यावर मात कशी करायची? असा प्रश्न सुरूवातीच्या काळात प्रशासनालाही पडला होता. याच दरम्यान, राज्यमंत्री सुरेश धस यांच्या पुढाकारातून शिरूर शहराला पाणी पुरविण्यासाठी सिंदफणा मध्यम प्रकल्पातून पाणी आणण्यासाठी ७० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला.
तालुका निर्मितीनंतर आष्टी विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेत शिरूरची दोन मतदारसंघात फाळणी झाली. त्यात आष्टी मतदारसंघात ५३ आणि बीड मतदारसंघात ३३ गावे विभागली गेली. ५३ गावे शिरूरसह आष्टी मतदारसंघात गेली. या भागाच्या विकासाची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न शिरूरकरांना पडला होता. मात्र राज्यमंत्री सुरेश धस यांनी ही जबाबदारी समर्थपणे पेलली. याच दरम्यानच्या काळात ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या होत्या. या बरोबरच शहराचा पाणीप्रश्नही बिकट बनला होता. ग्रामपंचायत निवडणुकीत सुरेश धस यांनी शिरूरच्या पाणी प्रश्नाचा तोडगा कायमचा काढणार असा शब्द येथील ग्रामस्थांना तेंव्हा दिला होता. हा शब्द सुरेश धस यांनी येत्या काही महिन्यातच पूर्ण केला असल्याचे येथील नागरिक अजूनही सांगतात. पाणी प्रश्नाबरोबरच अंतर्गत सिमेंट रस्ते , कब्रस्तान, संरक्षण भींत या कामा बरोबरच सिद्धेश्वर संस्थानला स्वतंत्र पाणीपुरवठा योजना दिली. शिरूर शहर ते जुने बसस्थानक या दरम्यानच्या रस्त्याचा विकास केला. ही विकास कामे आजही लोकांच्या स्मरणात आहेत. (वार्ताहर)