रिपाइं एकतावादी १६ जागा लढविणार

By Admin | Updated: September 23, 2014 23:22 IST2014-09-23T23:09:22+5:302014-09-23T23:22:12+5:30

परभणी : रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (एकतावादी) च्या वतीने मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये विधानसभेच्या १६ जागा लढविण्याचा निर्णय पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला़

RPI loyalists will fight for 16 seats | रिपाइं एकतावादी १६ जागा लढविणार

रिपाइं एकतावादी १६ जागा लढविणार

परभणी : रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (एकतावादी) च्या वतीने मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये विधानसभेच्या १६ जागा लढविण्याचा निर्णय पक्षाच्या नुकत्याच परभणीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला़
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांच्या आदेशान्वये परभणीत रिपाइं एकतावादीचे मराठवाडा प्रदेश प्रभारी अध्यक्ष विजय साळवे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली़ बैठकीत पुरोगामी विचाराच्या पक्षांसोबत सन्मानजनक युती न झाल्यास मराठवाड्यातील सोळा विधानसभेच्या जागा स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेण्यात आला़ यावेळी युवक आघाडीचे जिल्हाध्यक्षपदी विनोद तुपसमिंदर तर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी गोकर्णाताई कदम यांची निवड करण्यात आली़ यावेळी आयोजक रवी भदर्गे, मिलिंद शिराढोणकर, दिगंबर गायकवाड, राजू जगताप, अनिल जळकोटकर, राहुल कांबळे, उषाताई कांबळे, पंडित झिंझुर्डे, खदीर शेख, सुरेश रोडे, दिलीप लोंढे, रणवीर कांबळे, सुरेश अंबोरे, राकेश साळवे, अनंता आचार्य आदींची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)

Web Title: RPI loyalists will fight for 16 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.