सराईत ‘झोल्या’च्या आवळल्या मुसक्या
By Admin | Updated: July 3, 2017 23:44 IST2017-07-03T23:41:43+5:302017-07-03T23:44:58+5:30
बीड :घरफोड्यांचा मास्टर मार्इंड असलेला सराईत गुन्हेगार झोल्याच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आहे

सराईत ‘झोल्या’च्या आवळल्या मुसक्या
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : आष्टी शहरासह तालुक्यात घरफोड्या होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, तसेच पोलिसांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत होती. अखेर या घरफोड्यांचा मास्टर मार्इंड असलेला सराईत गुन्हेगार झोल्याच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आहे. ६ घरफोड्या उघडकीस आल्या असून, पावणेतीन लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
२०१७ या वर्षात आष्टीसह परिसरात अनेक ठिकाणी घरफोड्या झाल्या. लाखोंचा ऐवज लंपास करण्याबरोबरच घरातील लोकांना मारहाण झाल्याच्या घटनाही घडल्या. यामुळे आष्टी तालुक्यात चोरट्यांची दहशत निर्माण झाली होती. पोलीस तपास करीत नसल्याचे ताशेरे ओढले जात होते. पोलिसांसमोरही या घरफोड्यांचा शोध लावण्याचे मोठे आव्हान होते. स्थानिक गुन्हे शाखेचे दिनेश आहेर यांच्यासह पूर्ण टीम आष्टी तालुक्यात तळ ठोकून होती.
या भागातील सराईत, तसेच छोट्यामोठ्या गुन्हेगारांची यादी गुन्हे शाखेने मागविली होती; परंतु हाती काहीच लागले नाही. त्यामुळे तपास लावण्याचे मोठे आव्हान आहेर यांच्या टीमसमोर होते. अखेर २९ जून रोजी त्यांना शेकापूर रोडवरील पांडेगव्हाणमध्ये घरफोड्यातील मास्टर मार्इंड आयलाश्या ऊर्फ झोल्या जंगल्या भोसले (रा. पांडेगाव) बद्दल माहिती मिळाली. गुन्हे शाखेने शिताफीने सापळा रचून धुळ्याला बेड्या ठोकल्या. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. दिनेश आहेर, सपोनि सचिन पुंडगे, तुळशीराम जगताप, भास्कर केंद्रे, प्रसाद कदम, सतीश कातखडे, सखाराम सारूक, अशोक दुबाले, संजय खताळ आदींनी केली.