रोहिलागडचा तलाठी लाचेच्या सापळ्यात
By Admin | Updated: December 24, 2014 01:00 IST2014-12-24T00:47:27+5:302014-12-24T01:00:26+5:30
अंबड : तालुक्यातील रोहिलागड येथील तलाठी दत्तात्रय पुंजाजी बावस्कर याला ७ हजार रूपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने

रोहिलागडचा तलाठी लाचेच्या सापळ्यात
अंबड : तालुक्यातील रोहिलागड येथील तलाठी दत्तात्रय पुंजाजी बावस्कर याला ७ हजार रूपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने २३ डिसेंंबर रोजी दुपारी २ वाजता येथील शिवाजीनगर भागात पकडले. सातबारा दुरूस्त करण्यासाठी आरोपीने ४० हजार रूपयांची मागणी केली होती.
तक्रारदाराचे वडील व चुलते यांच्या वाटणीनुसार शेतीचे क्षेत्र ठरविण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष ७/१२ वर नोंदणी करताना ठरल्याप्रमाणे वाटणी लावण्यात आली नव्हती. चुकीची नोंद घेण्यात आल्याने ती दुरूस्त करण्यासाठी बावस्कर यांच्याकडे पाठपुरावा सुरू करण्यात आला. त्यापोटी १८ हजार रूपये देण्यात आले. मात्र उर्वरित रक्कम द्यावी, त्यानंतरच काम होईल, असे बावस्कर यांनी सांगितले. त्यामुळे तक्रारदाराने अॅन्टीकरप्शनकडे तक्रार दिली. त्यासाठी २२ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली. २३ रोजी खाजगी कार्यालयात लाच घेताना रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक प्रताप शिकारे, पो.नि. व्ही.बी. चिंचोले, मेहेत्रे, टेहरे, संतोष धायडे, किशोर पाटील, नंदू शेंडीवाले, प्रदीप दौंडे, अमोल आगलावे, उदगीरकर, उबाळे, कुदर, पाटील, चव्हाण, राजपूत यांनी केली.