भूखंडाच्या वादातून सेवानिवृत्त कार्यकारी अभियंत्यावर रॉडने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:04 IST2021-09-13T04:04:10+5:302021-09-13T04:04:10+5:30

याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसंत चव्हाण, प्रथमेश चव्हाण आणि एका महिलेचा आरोपींमध्ये ...

Rod attacks retired executive engineer over plot dispute | भूखंडाच्या वादातून सेवानिवृत्त कार्यकारी अभियंत्यावर रॉडने हल्ला

भूखंडाच्या वादातून सेवानिवृत्त कार्यकारी अभियंत्यावर रॉडने हल्ला

याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसंत चव्हाण, प्रथमेश चव्हाण आणि एका महिलेचा आरोपींमध्ये समावेश आहे. तोळाराम कृष्णाजी राठोड (वय ६२, रा. एन ४, सिडको) असे जखमीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, तोळाराम राठोड आणि वसंत चव्हाण यांच्या मालकीचे भूखंड जवळ जवळ आहेत. त्यांच्यांत भूखंडाच्या चतु:सीमेवरून वाद सुरू आहेत. असे असताना चव्हाण यांच्या परिवाराने भूखंडावर खांब रोवण्यास सुरुवात केली. हद्दीवरून वाद सुरू असताना तुम्ही परस्पर खांब का लावत आहात, अशी विचारणा त्यांनी केली. यावरून त्यांच्यात वाद झाल्याने चव्हाण कुटुंबाने लोखंडी रॉडने राठोड यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. पाठीत, कंबरेवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेत जखमी झालेल्या राठोड यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. याविषयी त्यांच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक गणेश माने हे आरोपींचा शोध घेत आहेत.

Web Title: Rod attacks retired executive engineer over plot dispute