‘रॉकी’ची कांस्यपदकाला गवसणी
By Admin | Updated: January 1, 2017 23:51 IST2017-01-01T23:50:32+5:302017-01-01T23:51:50+5:30
बीड : जिल्हा पोलीस दलाच्या श्वानपथकातील रॉकी या श्वानाने देशपातळीवरील कर्तव्य मेळाव्यात तृतीय क्रमांक पटकावून कांस्यपदकाला गवसणी घातली.

‘रॉकी’ची कांस्यपदकाला गवसणी
बीड : जिल्हा पोलीस दलाच्या श्वानपथकातील रॉकी या श्वानाने देशपातळीवरील कर्तव्य मेळाव्यात तृतीय क्रमांक पटकावून कांस्यपदकाला गवसणी घातली. यानिमित्ताने बीड पोलिसांना रॉकीने नववर्षाची भेट दिली असून, रविवारी त्याचे बीडमध्ये आगमन झाले.
यापूर्वी २०१२ मध्ये बीडच्या श्वानपथकातील ‘डॉन’ने भोपाळ येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. तब्बल ४ वर्षांनंतर रॉकीने हा मान मिळवीत बीडचा दबदबा कायम ठेवला. राज्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून रॉकीची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. तपासकामात कौशल्य दाखवून रॉकीने कांस्यपदकावर आपले नाव कोरले.
त्याच्या यशाबद्दल अधीक्षक अनिल पारसकर, अपर अधीक्षक वैभव कलबुर्मे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांनी श्वानपथकातील फौजदार मधुकर चांदेकर, मार्गदर्शक पो.ना. संजय खाडे, पो.हे.कॉ. नितीन येवले, शिपाई बाळासाहेब तुपे यांचे कौतुक केले. यावेळी त्यांचा सत्कारही करण्यात आला. (प्रतिनिधी)