शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

खासगी रुग्णालयात लूट

By admin | Updated: August 6, 2014 02:38 IST

वाळूज महानगरात डेंग्यू व चिकुन गुनिया या साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून या परिसरात खाजगी रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत.

खासगी रुग्णालयात लूट शेख महेमूद तमीज वाळूज महानगरवाळूज महानगरात डेंग्यू व चिकुन गुनिया या साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून या परिसरात खाजगी रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. अशातच तिघांचा बळी गेल्यामुळे नागरिक भयभीत झाले असून त्यांच्या असहायतेचा फायदा घेऊन खाजगी रुग्णालयांनी या गरीब कामगार रुग्णांची लूट सुरू केली असल्याचे चित्र परिसरात पाहावयास मिळत आहे. याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळे कामगारांत असंतोषाचे वातावरण आहे.बजाजनगर, पंढरपूर, वाळूज, रांजणगाव शेणपुंजी, सिडको वाळूज महानगर, वडगाव कोल्हाटी इ. ठिकाणी अस्वच्छतेमुळे साथीचे आजार बळावले आहेत. स्थानिक ग्रामपंचायती, तसेच एमआयडीसी प्रशासनाचे स्वच्छतेकडे कमालीचे दुर्लक्ष असल्यामुळे रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. डेंग्यूमुळे तिघा रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. बजाजनगर परिसरातील खाजगी रुग्णालये साथीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांनी हाऊसफुल्ल झाली आहेत. गरीब कामगार रुग्णांची लूट खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी सुरू केली आहे. रुग्णालयात येताच खाजगी डॉक्टर डेंग्यूची भीती दाखवीत त्वरित अ‍ॅडमिट होण्याचा सल्ला देतात. धास्तावलेले रुग्णही लगेच अ‍ॅडमिट होतात. डिपॉझिटच्या नावाखाली ५ ते १० हजार रुपयांची मागणी केली जाते. यानंतर डेंग्यूची तपासणी करण्यासाठी विविध तपासण्यांसाठी भरमसाठ शुल्क आकारले जात असल्याच्या रुग्णांच्या तक्रारी आहेत. तपासण्या झाल्यानंतर रुग्णांना चार ते पाच दिवस रुग्णालयातच अ‍ॅडमिट होण्याचा सल्ला दिला जातो. रुग्णांकडून विविध चाचण्या आदींच्या नावाखाली पैसे उकळले जात असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे. गरीब कामगारांची लूट सुरू केल्यामुळे असंतोषाचे वातावरण आहे.