व्यापाऱ्याला लुटणाऱ्या दरोडेखोरोंना बारा तासांत अटक
By | Updated: December 4, 2020 04:14 IST2020-12-04T04:14:57+5:302020-12-04T04:14:57+5:30
वडोद बाजार : वडोद बाजार ते जातेगाव रस्त्यावरील वाघलगाव शिवारात बुधवारी सायंकाळी ६ वाजेदरम्यान एका कापसाच्या व्यापाऱ्याला मारहाण करून ...

व्यापाऱ्याला लुटणाऱ्या दरोडेखोरोंना बारा तासांत अटक
वडोद बाजार : वडोद बाजार ते जातेगाव रस्त्यावरील वाघलगाव शिवारात बुधवारी सायंकाळी ६ वाजेदरम्यान एका कापसाच्या व्यापाऱ्याला मारहाण करून त्याच्याकडून पाच लाख रुपये लुटून नेल्याची घटना घडली होती. त्यासंबंधी कांताराम ओंकार पवार (३०) यांनी फिर्याद दिली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने तपासाचे चक्र फिरविण्यात आले. अवघ्या बारा तासांत स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने दरोडेखोरांना अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिल्लोड येथील येथील पुनीत कॉटन इंडस्ट्रीमध्ये फिर्यादी कांताराम पवार हे कापूस विक्री करतात. बुधवारी, दि.२ रोजी सायंकाळी कांताराम पवार व काकाजी साहेबराव सोमदे हे दोघे कापूस विक्री करून पाच लाख रुपये घेऊन गावी दोनवाडा येथे निघाले. बाजार जातेगावमार्गे जात असताना वाघलगाव फाटा येथे सायंकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास दोन मोटारसायकलवर आलेल्या दरोडेखोरांनी त्यांना मारहाण करून त्यांच्याजवळील पाच लाख रुपये रक्कम हिसकावून घेतली. याप्रकरणी फिर्यादीवरून बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वडोद बाजार पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळाची भेट देऊन पाहणी केली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय सूत्रांना सतर्क करून गुन्हेगाराचा शोध लावला. आरोपी विशाल साईनाथ काकडे (२०), रा. कोलते टाकळी, योगेश निवृत्ती कोणते (२४), रा. कोणते टाकळी, आकाश ऊर्फ लाल्या राजेंद्र बोरसे (२४), रा. वारेगाव फुलंब्री, अमोल ऊर्फ डोळा संतोष जाधव (२१), रा. वारेगाव, फुलंब्री, सचिन रमेश बनकर (१९), रा. वारेगाव, प्रदीप गजानन तायडे (२४), रा. वाढोना, जि. जालना यांना अटक करण्यात आली आहे. आरोपीच्या ताब्यातून दोन लाख ९६ हजार रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटरसायकल, सहा मोबाइल हँडसेट, असा एकूण चार लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.