शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

चक्क टक्केवारीत अडकली रस्त्यांची कामे; २५ कोटींच्या कामांचा नारळ फोडल्यानंतर भांडणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 15:59 IST

सा. बां. मंत्री अशोक चव्हाण यांनी विशेष बाब म्हणून २५ कोटींचा निधी मंजूर केला आहे.

- मुजीब देवणीकरऔरंगाबाद : महाविकास आघाडी सरकार ऐतिहासिक औरंगाबाद शहराला भरभरून देत आहे. मात्र, स्थानिक राजकीय मंडळी, अधिकाऱ्यांच्या टक्केवारीमुळे विकासकामांवर अक्षरश: पाणी फेरले जात आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाने शहराच्या आसपासचे रस्ते गुळगुळीत करण्यासाठी २५ कोटींचा निधी दिला. निविदा झाल्या. घाईघाईत विकासकामांचा नारळ फोडला; पण वर्कऑर्डरपूर्वी राजकीय मंडळी, अधिकारी टक्केवारी मागत असल्याने कामे सुरू झाली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सा. बां. मंत्री अशोक चव्हाण यांनी विशेष बाब म्हणून २५ कोटींचा निधी मंजूर केला. २७ जानेवारी २०२१ रोजी सा. बां. विभागाला पुढील कारवाईचे आदेश देण्यात आले. युद्धपातळीवर एकूण सात प्रमुख रस्ते गुळगुळीत करण्याचा निर्णय झाला. निविदाही प्रसिद्ध करण्यात आल्या. इच्छुक कंत्राटदारांनी निविदा भरल्या. वर्कऑर्डर झालेली नसतानाही तीन महिन्यांपूर्वी चव्हाण यांच्या हस्ते विकासकामांचा नारळही फोडण्यात आला. आता प्रत्यक्षात कामे सुरू करण्यात मोठी अडचण निर्माण झाली आहे. ज्या कंत्राटदारांना कामे मिळाली, त्यांच्यावर राजकीय मंडळी, अधिकारी दबाव टाकत आहेत. ‘मी काम करण्यास इच्छुक नसल्याचे लिहून द्या. ‘साहेब’ (स्थानिक राजकीय नेते) सांगत असलेल्या कंत्राटदाराला काम द्यायचे आहे’. पण कंत्राटदार काम सोडायला तयार नाहीत. त्यामुळे वाद धुमसत आहे. साहेबांना मर्जीतील कंत्राटदाराला काम देऊन आपली टक्केवारी अगोदर काढून घ्यायची आहे. नंतर काम होवो की न होवो; ‘साहेबांना’ काही देणेघेणे नाही.

शासनाने मंजूर केलेली कामे :- साजापूर, पंढरपूर, नक्षत्रवाडी, भिंदोन, भालगाव रस्ता दोन कोटी- चिकलठाणा येथील जुना जकात नाका रस्ता- एक कोटी- कांचनवाडी, ईटखेडा, सातारा-देवळाई, गांधेली, आडगाव, लाडगाव रस्ता- दोन कोटी- मिल कॉर्नर, मकबरा, लेणीपर्यंत- दोन कोटी- पुणे-औरंगाबाद ते पैठण रोड, लिंक रस्ता- २ कोटी ४५ लाख- चिकलठाण्यातील केंब्रिज शाळा ते सावंगी वळण रस्ता- १ कोटी ३० लाख- बाबा पेट्राेल पंप, मिल काॅर्नर, दिल्ली गेट, हर्सूल टी पाॅईंटपर्यंत- ३ कोटी ५० लाख

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAshok Chavanअशोक चव्हाण