नागापूर फाटा ते नागापूर गावच्या रस्त्याचे काम निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:04 IST2021-02-08T04:04:26+5:302021-02-08T04:04:26+5:30

नागापूर फाटा ते नागापूर गाव या एक कि. मी. रस्त्याचे नव्याने झालेले काम हे अत्यंत ...

Road work from Nagpur Fata to Nagpur village is inferior | नागापूर फाटा ते नागापूर गावच्या रस्त्याचे काम निकृष्ट

नागापूर फाटा ते नागापूर गावच्या रस्त्याचे काम निकृष्ट

नागापूर फाटा ते नागापूर गाव या एक कि. मी. रस्त्याचे नव्याने झालेले काम हे अत्यंत निकृष्ट झालेले असून, ते दर्जेदार करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. त्यानंतर आ. प्रशांत बंब यांनी या रस्त्याची शुक्रवारी पाहणी केली. पूर्वी ग्रामस्थांना चिखलातून प्रवास करावा लागत होता, आता जो रस्ता झाला तोही निकृष्ट झाल्यामुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या रस्त्याच्या दर्जाबाबत अभियंता केदार यांच्याशी संपर्क साधला असता गुणवत्ता निरीक्षकांच्या तपासणीनंतरच रस्त्याच्या दर्जा कळेल, असे त्यांनी सांगितले. या रस्ता कामाची चौकशी करण्याची मागणी शेंदुरवादा सर्कलच्या जि. प. सदस्या छाया अग्रवाल यांनी केली असून, यावेळी शिवप्रसाद अग्रवाल, उपसरपंच ताराचंद दुबिले, संजय सुकासे, विलास पाटील, सोपान चव्हाण, हाकिम पटेल, गणेश सुकासे आदी उपस्थित होते.

फोटो : नागापूर फाटा ते नागापूर गाव या रस्त्याची पाहणी करताना आ. प्रशांत बंब.

Web Title: Road work from Nagpur Fata to Nagpur village is inferior