शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

६० लाख खर्चूनही रस्त्याची चाळण; व्हिआयपी रोडवरील खड्ड्यात मनसेने घातले अधिकाऱ्यांचे पित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2021 15:00 IST

MNS Agitation : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज जळगाव रोडवरील एसबीओए शाळेजवळ अधिकाऱ्यांचे पित्र पूजन आंदोलन केले.

औरंगाबाद: दोन महिन्यांपूर्वी जळगाव रस्त्यावर खड्डे बुजविण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने ६० लाख रुपये खर्च केले. नुकत्याच झालेल्या पावसात या व्हीआयपी रोडची खड्ड्यामुळे चाळण झाली. भ्रष्ट अधिकाऱ्यांची संवेदना मेल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज अधिकाऱ्यांच्या नावाने पित्र पूजन केले.

महिनाभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जळगाव रोडची चाळणी झाल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित केले. खड्डेमय रस्त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. या वृत्ताची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज जळगाव रोडवरील एसबीओए शाळेजवळ अधिकाऱ्यांचे पित्र पूजन आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी महापालिका आणि रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. हातात खड्ड्यांचे फलक दाखवून, हीच का तुमची स्मार्ट सिटी, असा सवाल करीत आंदोलन केले. आठ दिवसांत हा व्हीआयपी रस्ता खड्डेमुक्त केला नाही, तर अधिकाऱ्यांना खड्ड्यात बसविल्याशिवाय मनसे गप्प बसणार नाही, असा इशारा जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी दिला. या आंदोलनात सतनामसिंग गुलाटी, संदीप कुलकर्णी, अब्दूल रशीद खान, अशोक पवार पाटील, संतोष कुटे, नंदू नावपुते, अभय मांजरामकर,,गणेश साळुंके ,संदीप दांडगे, मनोज भिंगारे, राजू चव्हाण, बाबुराव जाधव, रुपेश शिंदे, चेतन पाटील, विशाल इराळे पाटील, प्रवीण मोहिते, राहुल कुलकर्णी, रवी गायकवाड, नितीन इंचुरकर, प्रशांत जोशी,कृष्णा घायट पाटील आदिंनी सहभाग नोंदविला. 

आंदोलनासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त आंदोलक अचानक रास्ता रोको करण्याची शक्यता लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ, पोलिस निरिक्षक संभाजी पवार, पोलीस निरीक्षक विनोद सलागरकर, कैलाश देशमाने, एपीआय श्रद्धा वायदंडे, उपनिरीक्षक संदीप शिंदे, महादेव गायकवाड हे कर्मचाऱ्यांसह आंदोलनापूर्वी हजर होते.

मोठी बातमी ! कोरोना वाढल्याने मानवतमध्ये गर्दीच्या ठिकाणांवर दहा दिवस निर्बंध

टॅग्स :MNSमनसेAurangabadऔरंगाबादagitationआंदोलन